Pune Ganesh Visarjan: अलका चौकात मंडळाची मोठी गर्दी; पोलिसांकडून कार्यकर्त्यांना चोप, २४ तासानंतरही पुण्यात विसर्जन मिरवणुका सुरुच

Ganesh Mandal Karyakate Beaten By Police: पुण्यामध्ये २४ तासांनंतरही गणेश विसर्जन सुरूच आहे. अलका चौकामध्ये पोलिसांनी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना चोप दिला.
Pune Ganesh Visarjan: अलका चौकात मंडळाची मोठी गर्दी; पोलिसांकडून कार्यकर्त्यांना चोप, २४ तासानंतरही पुण्यात विसर्जन मिरवणुका सुरुच
Ganesh Mandal Karyakate Beaten By PoliceSaam Tv
Published On

पुण्यामध्ये गणपती विसर्जन सलग दुसऱ्या दिवशी देखील सुरूच आहे. पुण्यात मोठ्या थाटामाटत, ढोल-ताशाच्या गजरात गुलालाची उधळण करत सार्वजनिक गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. २४ तास उलटूनही पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक अद्यापही सुरूच आहे. पुण्यातील अलका चौकातून केवळ ११७ मंडळ गणेश विसर्जनासाठी आतापर्यंत गेली आहेत.

पुण्यातील लक्ष्मी रोड, केळकर रोड, कुमठेकर रोड, टिळक रोडवर अनेक गणेशोत्सव मंडळांची विसर्जन मिरवणूक सुरूच आहे. मिरवणूक संपण्यासाठी अजून ३ ते ४ तास लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लवकरात लवकर मंडळ पुढे काढण्यासाठी पुणे पोलिस प्रयत्न करत आहेत.

पुणे अलका चौकात गणेशोत्सव मंडळानी गर्दी केली आहे. एकाच वेळी अनेक मंडळांचे गणपती चौकात दाखल झाले. जूनही महत्वाच्या चार ही रस्त्याने गणेशोत्सव मंडळं आपले बाप्पा घेऊन येत आहेत. मानाच्या गणपतींचे विसर्जन वेळेत झाले तरीही अजून पुण्यात मिरवणुका सुरूच आहेत. पुणे पोलिस गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना मिरवणुका लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आग्रह करत आहेत.

Pune Ganesh Visarjan: अलका चौकात मंडळाची मोठी गर्दी; पोलिसांकडून कार्यकर्त्यांना चोप, २४ तासानंतरही पुण्यात विसर्जन मिरवणुका सुरुच
Ganesh Visarjan 2024 : गणरायाच्या मिरवणुकीतील राडा, भिवंडी अन् बुलढाण्यात दगडफेक अन् हाणामारी, परिसरात तणावाचे वातावरण

अशातच पुण्यामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान ऐकत नसलेल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून चांगलाच चोप देण्यात आला. अलका चौकाच्या पुढे एक सार्वजनिक गणेश मंडळ एका जागी थांबून डीजे वाजवत होते. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या मंडळाची मोठी कोंडी झाली. पोलिसांनी वारंवार सांगून देखील पुढे सरकत नसल्याने पोलिसांना या मंडळाच्या कार्यकर्त्यांना चोप द्यावा लागला. या ठिकाणी काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर पुणे पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी येत वाद थांबावंत त्या गणेश मंडळाला पुढे सरकवले.

Pune Ganesh Visarjan: अलका चौकात मंडळाची मोठी गर्दी; पोलिसांकडून कार्यकर्त्यांना चोप, २४ तासानंतरही पुण्यात विसर्जन मिरवणुका सुरुच
Ganesh Visarjan 2024: विसर्जन सोहळ्याला गालबोट, राज्यात १५ जणांचा मृत्यू, नाशिक-धुळे अन् अमरावतीमध्ये हळहळ!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com