Ganesh Visarjan 2024: विसर्जन सोहळ्याला गालबोट, राज्यात १५ जणांचा मृत्यू, नाशिक-धुळे अन् अमरावतीमध्ये हळहळ!

Accidental Deaths in Ganesh Visarjan Updates: नाशिक, अमरावतीमध्ये काही जण वाहून गेले. जिंतूरात DJ च्या आवाजामुळे एकाचा मृत्यू झालाय. गणपती विसर्जनावेळी राज्यात १५जणांचा मृत्यू झाल्याचं आतापर्यंत समोर आलेय.
Mumbai Ganesh Visarjan
Mumbai Ganesh VisarjanSaam Tv
Published On

Maharashtra Ganesh Visarjan 2024 News Updates: "एक दोन तीन चार, गणपतीचा जय जयकार", ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया… अशा जयघोषात फुलांची मनसोक्त उधळण करत उत्साह आणि भावपूर्ण वातावरणात लाडक्या गणरायाला राज्यभरात निरोप दिला. भक्तिमय वातावरणात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. पुढच्या वर्षी लवकर , असे म्हणत जड अंतकरनाने गणेशभक्तांनी लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप दिला. पण याच उत्सवाला राज्यात अनेक ठिकाणी गालबोट लागले आहे. राज्यभरात १५ जणांचा मृत्यू झालाय. धुळ्यात ट्रक्टरखाली चिरडून ३ बालकांच मृत्यू झाला. तर नाशिक, अमरावतीमध्ये काही जण वाहून गेले. जिंतूरात DJ च्या आवाजामुळे एकाचा मृत्यू झालाय. गणपती विसर्जनावेळी राज्यात १३ जणांचा मृत्यू झाल्याचं आतापर्यंत समोर आलेय.

नाशिकमध्ये तीन जण वाहून गेले -

गणपती विसर्जनाला गेलेल्या दोन युवकांचा वालदेवी नदीपात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील ही घटना घडली.ओंकार गाडे आणि स्वयंम मोरे अशी दोघा मृत युवकांची नावं आहेत. दोघे जण मंगळवारी संध्याकाळी मित्रांसोबत गणपती विसर्जनासाठी गेले असता नदीपात्रातील एका खड्ड्यात पडले. मात्र अग्निशमन दल तसच मदत पोहचेपर्यंत दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.

अमरावती जिल्हयात गणेश विसर्जनादरम्यान तीन जण वाहून गेले

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात गणेश विसर्जनादरम्यान तीन जण वाहून गेले. पूर्णा नगर नदीपात्रात तीन जण वाहून गेल्याची घटना घडली आहे. यामध्ये मयूर गजानन ठाकरे, अमोल विनायक ठाकरे यांचा समावेश आहे. दर्यापुर तालुक्यांतील दारापूर येथील गणपती विसर्जनादरम्यान राजेश संजय पवार हा २७ वर्षीय युवक पाण्यामध्ये बुडाला आहे. जिल्हा शोध बचाव पथक आज सकाळी पूर्णा नदीत पात्रात दाखल होणार असून शोध सुरू होणार आहे.

अहमदनगरमध्ये दोन जणांचा मृत्यू

गणपती विसर्जनादरम्यान दोन युवकांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना अहमदनगरमध्ये घडली आहे. मंगळवारी सायंकाळी विळद गावातील साकळाई तलाव येथे ही घटना घडली. घरगुती गणपती विसर्जन करत असताना पाय घसरून तलावात पडल्याने बुडून झाला मृत्यू..

अजिंक्य नवले (वय16) आणि केतन शिंदे (वय18) असे मयत युवकांची नावे आहेत. स्थानिक नागरिक आणि महापालिका आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने मृतदेह काढले बाहेर काढण्यात आले. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद..

जिंतूरमध्ये एकाचा मृत्यू -

जिंतूर तालुक्यातील मौजे चांदज येथे गणेश सार्वजनिक गणेश मंडळाच्या विसर्जनादरम्यान करपरा नदीमध्ये भागवत कल्याण अंभोरे (वय 13 वर्षे) मुलगा वाहून गेला.

जिंतूरात DJ च्या आवाजामुळे एकाचा मृत्यू,दोघांची प्रकृती गंभीर

डीजेच्या आवाजामुळे एका 37 वर्षीय तरुणाचं मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाल्याची घटना परभणीच्या जिंतूर शहरात घडली. संदीप विश्वनाथ कदम (वय 37)असे या मयत तरुणाचे नाव आहे. तर शिवाजी कदम, शुभम कदम, गोविंद कदम हे तीन जण जखमी आहेत.

धुळ्यात गणेशोत्सवाला गालबोट; विसर्जन मिरवणुकीत ३ बालकांचा चिरडून मृत्यू

धुळ्यातील चितोड येथे मंगळवारी गणपती मिरवणुकीवेळी ट्रॅक्टरखाली आल्याने तीन बालकांचा जागीच मृत्यू झाला. मिरवणुकीत गाण्याच्या तालावर सर्व कार्यकर्ते नाचत होते. मद्य धुंद असलेल्या चालकाने ट्रॅक्टर अचानक सुरू केला. त्या ट्रॅक्टरखाली आल्याने तीन लहान बालकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एक मुलगी आणि दोन मुलांचा समावेश आहे. या घटनेमुळे धुळ्यात खळबळ उडाली आहे.

इंदापूरात एकजण बुडाला -

इंदापूरात गणेश विसर्जनाला गेल्यावर घाटात एक जण बुडाला. इंदापूर तालुक्यातील निरा नरसिंहपुर येथे ही दुर्देवी घटना घडली. अनिकेत कुलकर्णी असं या युवकाचं नाव आहे. निरा नरसिंहपुर येथील नीरा नदीच्या लक्ष्मी घाटावर तो गणेश विसर्जनासाठी गेला होता आणि त्याचवेळी ही घटना घडली त्याचा शोध घेतला जातोय.

अकोल्यात एकाचा मृत्यू

अकोल्यात गणेश विसर्जनादरम्यान एक दुखत घटना घडली. अकोला जिल्ह्यातील म्हैसांग येथील पूर्णा नदीवर गणेश विसर्जनावेळी 18 वर्षीय तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाला. मंगळवारी गणेश हा आईसोबत घरगुती गणेशाचा विसर्जन करण्यासाठी म्हैसांग इथे पूर्णा नदीवर गेला होता. गणेश विसर्जनावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तो नदीत बुडाला. तातडीने विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांनी त्याला नदीबाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com