Pune Fraud News: धक्कादायक! पॉलिसी काढून देण्याच्या बहाण्याने १.५६ कोटींची फसवणूक; महिलेने घेतली पोलिसात धाव

या प्रकरणी 13 अज्ञात मोबाईल क्रमांक धारक व सहा वेगवेगळे बँकेचे खातेधारकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune Fraud News
Pune Fraud NewsSaamtv
Published On: 

अक्षय बडवे, प्रतिनिधी...

Pune News: गेल्या काही दिवसांपासून पुण्यात फसवणूकींच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ऑनलाईन व्यवहार वाढल्यामुळे ऑनलाईन फसवणूकीचे प्रकारही शहरात वाढताना दिसत आहेत.

अशीच एक धक्कादायक घटना समोर आली असून पॉलिसी काढून देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलेची १.५६ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी 64 वर्षीय महिलेकडून पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Pune Fraud News
Opposition Meeting: पाटण्यातील बैठकीआधीच आप-काँग्रेसमध्ये जुंपली, आम आदमी पक्षाचा बैठकीतून वॉक आऊट करण्याचा इशारा

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यात (Pune) एका जेष्ठ महिलेला पॉलिसी काढून देण्याच्या बहाण्याने व जुने पॉलिसीचे पैसे परत मिळवून देण्याचे अमिष दाखवून 1 कोटी 56 लाख 27 हजार रुपयांचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे. (Latest Marathi News)

सुरुवातीला तक्रारदार महिलेला करण नावाच्या व्यक्तीने फोन करुन वेगवेगळया पॉलिसी काढण्याबाबत माहिती दिली. तसेच सदर पॉलिसी काढल्यास त्यावर केवळ एक हफ्ता भरावा लागेल व पॉलिसीची रक्कम तीन वर्षांनी तुम्हाला परत मिळेल असे आश्वासन दिले. यानंतर तक्रारदारास पॉलिसी काढण्यास भाग पाडून चेक द्वारे 2011 मध्ये एकूण आठ लाख 30 हजार रुपये भरुन घेतले गेले.

Pune Fraud News
Beed Crime News: बीड हादरलं! लग्नात शुल्लक कारणावरुन २ गटात राडा; एकाचा जागीच मृत्यू

मुदत संपल्यानंतर तक्रारदार पॉलिसी कंपनीत गेल्या असता, त्यांना हफ्ते भरले नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांना दिल्ली येथून वेगवेगळ्या व्यक्तींचा फोन येऊन तुमचे पॉलिसीचे पैसे परत मिळवून देतो असे सांगत, ठराविक पैसे सांगितले जाईल त्या बँक खात्यावर भरण्यास दरवर्षी सांगण्यात आले.

तक्रारदार महिलेने एकूण एक कोटी 56 लाख 27 हजार रुपये विविध बँक खात्यावर भरले. मात्र, महिलेस कोणताही परतावा मिळाला नाही, ज्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी 13 अज्ञात मोबाईल क्रमांक धारक व सहा वेगवेगळे बँकेचे खातेधारकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.