Opposition Meeting: पाटण्यातील बैठकीआधीच आप-काँग्रेसमध्ये जुंपली, आम आदमी पक्षाचा बैठकीतून वॉक आऊट करण्याचा इशारा

AAP-Congress Clash Before Patna Meeting: काँग्रेस-आपच्या एकमेकांवरील आरोपांमुळे विरोधी पक्षांच्या ऐक्याच्या बैठकीआधीच विरोधकांमधील मतभेद समोर आले आहेत.
AAP-Congress Clash
AAP-Congress ClashSAAM TV
Published On

>>प्रमोद जगताप, साम टीव्ही

Opposition Meet In Patna On Friday: बिहारची राजधानी पटणा येथे उद्या देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक पार पडणार आहे. परंतु या बैठकीपूर्वीच आपने कॉंग्रेसला इशारा दिला आहे. केंद्र सरकारने दिल्ली सरकारच्या विरोधात आणलेल्या अध्यादेशाच्या विरोधात काँग्रेसने साथ दिली नाही, तर आम आदमी पक्ष बैठकीतून वॉक आऊट करेल असा इशारा आपने दिला आहे.

आधी अध्यादेशावर बोला त्यानंतरच विरोधी पक्षाच्या ऐक्यात आम आदमी पक्ष सहभागी होईल अशी भूमिका आपने घेतली आहे. आपच्या या भूमिकेनंतर आता कॉंग्रेसनेही आपवर टिका केली आहे. "विरोधी पक्षाच्या बैठकीत सहभागी न होण्यासाठी आप कारण शोधत आहे. ही देशाची चिंता करणाऱ्यांची ही बैठक आहे, सौदेबाजी करणाऱ्यांची नाही", अशी टीका दिल्ली काँग्रेसचे नेते संदीप दिक्षित यांनी आम आदमी पक्षावर केली आहे. त्यामुळे विरोधी पक्षांच्या ऐक्याच्या बैठकीआधीच विरोधकांमधील मतभेद समोर आले आहेत.

AAP-Congress Clash
Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा भाकरी फिरणार; अजितदादांचं नाव चर्चेत असतानाच बड्या नेत्याचा प्रदेशाध्यक्षपदावर दावा?

पाटणा येथून उद्या विरोधी पक्षांच्या ऐक्याचा बिगुल वाजणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पाटणा येथील निवासस्थानी विरोधी पक्षांचे नेत्यांची ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती हे नेते उपस्थित राहणार आहेत. (Marathi Tajya Batmya)

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी, सपा अध्यक्ष अखिलेश यादव आणि डीएमके प्रमुख आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन उद्या म्हणजेच शुक्रवारी पाटण्याला पोहोचणार आहेत. तर सीपीआयचे सरचिटणीस डी. राजा आणि सीपीआय-एमएलचे सरचिटणीस दीपांकर भट्टाचार्य यांच्यासह झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे या बैठकीसाठी पाटण्यात दाखल झाले आहेत. (Latest Political News)

AAP-Congress Clash
Darshana Pawar News: राहुल दर्शनाचा नातेवाईक होता का? दोघांमध्ये कधीपासून ओळख? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीत सर्व पक्ष मिळून किमान-समान कार्यक्रम ठरवू शकतात. याशिवाय येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपच्या एका उमेदवाराविरुद्ध विरोधी पक्षाचा एकच समान उमेदवार देण्यावर चर्चा होऊ शकते. या बैठकीनंतर भाजपचा पराभव करण्याचा संयुक्त ठरावही जाहीर होण्याची शक्यता आहे. बैठकीनंतर विरोधी पक्षनेते संयुक्त पत्रकार परिषदही घेणार आहेत. नितीश कुमार विरोधी नेत्यांचा पाहुणचार करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीयेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com