
अक्षय बडवे, साम टीव्ही
Pune Crime : पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीवरची काळी जादू काढतो म्हणत ज्येष्ठ महिलेला लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. भोंदूबाबाने ज्येष्ठ महिलेला २९ लाखांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील बालेवाडी भागात राहणाऱ्या ज्येष्ठ महिलेसोबत हा धक्कादायक प्रकार घडलाय. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पुण्यातील बालेवाडी भागात राहणाऱ्या ६२ वर्षीय ज्येष्ठ महिलेची एका भोंदूबाबाने लाखोंची आर्थिक फसवणूक केली. २९ लाखांची फसवणूक झाल्याचे कळताच ज्येष्ठ महिलेने पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांत गुन्हा नोंदवल्यानंतर आरोपीवर कारवाईची मागणी केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील बालेवाडी परिसरात राहत असलेल्या ज्येष्ठ महिलेला डिसेंबर महिन्यात एका अनोळखी व्यक्तीने फोन केला. यावेळी त्या व्यक्तीने तुमच्या घरावर दोष असल्याचे सांगितले. यावेळी त्या भोंदूबाबाने त्या महिलेला तुमच्या घरावर वास्तुदोष आहेत. तसेच तुमच्या मुलीमधील दोष काढून देतो अशी खोटी बतावणी केली.
महिलेला पुढे कथित जादूटोणा करत जाळ्यात ओढलं. तिला काळी जादू काढून देतो, असे सांगितले. त्याकरिता घरावर असलेले संकट दूर करण्यासाठी काही पूजा कराव्या लागतील, असे सांगून महिलेला ऑनलाइन पद्धतीने पैसे देण्यास सांगितले.
महिलेने आरोपीच्या बँक खात्यात वेळोवेळी २८ लाख ७७ हजार रुपये जमा केले. मात्र त्यानंतर जेव्हा त्या महिलेने त्या व्यक्तीला संपर्क करायचा प्रयत्न केला. तेव्हा मात्र समोरून काही उत्तर आलं नाही. आपली फसवणूक झाली आहे. लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसात धाव घेतली. या प्रकारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारानंतर परिसरातील नागरिकांकडून भोंदूबाबावर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.