Pune Crime: ब्रेकअपचा राग डोक्यात, सनकी प्रियकराने उचललं टोकाचं पाऊल, प्रेयसीच्या घरी गेला अन्...

Pune Relationship Dispute: पुण्यामध्ये प्रियसीसोबत झालेल्या ब्रेकअपनंतर संतप्त झालेल्या प्रियकरांने प्रेयसीची दोन वाहने पेट्रोल टाकून जाळली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
Pune Crime: ब्रेकअपचा राग डोक्यात, सनकी प्रियकराने उचललं टोकाचं पाऊल, प्रेयसीच्या घरी गेला अन्...
Pune Crime News Saam Tv
Published On

सचिन जाधव, पुणे

पुण्यामध्ये प्रेयसीने ब्रेकअप केल्यामुळे संतप्त झालेल्या प्रियकराने थेट तिची वाहनं जाळून टाकली. पुण्यातल्या रामटेकडी परिसरातील ही घटना आहे. प्रेयसीच्या दोन दुचाकी या व्यक्तीने पेट्रोल टाकून जाळल्या. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी वानवडी पोलिस तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यामध्ये प्रियसीसोबत झालेल्या ब्रेकअपनंतर संतप्त झालेल्या प्रियकरांने प्रेयसीची दोन वाहने पेट्रोल टाकून जाळली. पुण्यातील रामटेकडी परिसरामध्ये पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. अमजद पठाण असे प्रेयसीच्या वाहनांची जाळपोळ करणाऱ्या आरोपी प्रियकराचे नाव आहे. अमजद पठाणचे त्याच्या परिसरात असणाऱ्या एका महिलेसमोर प्रेमसंबंध होते.

Pune Crime: ब्रेकअपचा राग डोक्यात, सनकी प्रियकराने उचललं टोकाचं पाऊल, प्रेयसीच्या घरी गेला अन्...
Pune News: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! यंदाही मिळकतकरात वाढ नाही; ९ वर्षांपासून एकच दर

परंतू काही दिवसांपासून त्याची प्रेयसी त्याच्यासोबत बोलत नव्हती. यामुळे चिडलेल्या पठाणने या महिलेच्या घरासमोर असलेल्या दोन दुचाकी पेट्रोल टाकून आज पहाटेच्या सुमारास पेटवून दिल्या. याप्रकरणी आरोपी अमजद पठाण याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास वानवडी पोलिस करत आहेत.

Pune Crime: ब्रेकअपचा राग डोक्यात, सनकी प्रियकराने उचललं टोकाचं पाऊल, प्रेयसीच्या घरी गेला अन्...
Pune Crime: गाडी नीट चालवा म्हटल्याने तरुणांची सटकली, मारहाण करत व्यावसायिकावर धारधार शस्त्राने वार

तर, पुणे - सातारा महामार्गलगत असणाऱ्या नसरापूर गावात एकाच रात्री चोरट्यांनी ४ मेडिकल दुकानं फोडल्याची घटना घडली. पोलिसांकडून गेलेल्या मुद्देमालाची चौकशी करून गुन्हा दाखल करून घेण्याचे काम सुरू आहे. चोरी करताना दोन अज्ञात चोरटे मेडिकलमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले.

सीसीटीव्हीच्या आधारे नसरापूरच्या राजगड पोलिसांकडून चोरांचा शोध सुरू आहे. याआधीही गेल्या महिनाभरात पुणे- सातारा महामार्गालगत असणारी दुकानं फोडून चोरटयांनी मुद्देमाल पळवून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. चोरीच्या घटना टाळण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली.

Pune Crime: ब्रेकअपचा राग डोक्यात, सनकी प्रियकराने उचललं टोकाचं पाऊल, प्रेयसीच्या घरी गेला अन्...
Pune Crime News : पुण्यात मध्यरात्रीचा थरार! सिमेंट ब्लॉक डोक्यात घातला, सराईत गुन्हेगारांनी केला तरुणाचा खून

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com