Pune News: पुण्यात चाललंय काय? संतोष माने प्रकरणाची आठवण करून देणारा भयंकर प्रकार, दारूड्या चालकानं दामटवली PMPML बस

Pune Latest News: प्रवाशांनी जीव मुठीत धरुन प्रवास केला. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.
Pune PMPML Bus
Pune PMPML BusSaam Tv
Published On: 

Pune PMPML Bus: पुण्यामध्ये संतोष माने प्रकरणाची (Pune Santosh Mane Case) आठवण करुन देणारा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. पुण्यामध्ये मद्यधुंद चालकाने पीएमपीएमएल बस (PMPML Bus) चालवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यापासून ते हडपसरपर्यंत या मद्यपी चालकाने बस पळवली. प्रवाशांनी जीव मुठीत धरुन प्रवास केला. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.

Pune PMPML Bus
Tomato Price Hike: राज्यात मान्सून लांबल्यामुळे भाजीपाल्याचा दरावर परिणाम; बाजारात टोमॅटोचे दर चारपट वाढले

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात पीएमपीएमएल बस चोरी झाल्याची घटना ताजी असताना आता मद्यधुंद चालकाने पीएमपीएमएलची बस चालवल्याची घटना समोर आली आहे. एका कंत्राटी चालकाने मद्यधुंद अवस्थेत पुणे स्टेशन ते हडपसरपर्यंत ही बस सुसाट पळवली. चालक मद्यधुंद असल्याचे पाहून शेवटी प्रवाशांनीच बसचा ताबा घेऊन स्वत:चा जीव वाचवला.

Pune PMPML Bus
Shivsena Anniversary: शिवसेनेच्या इतिहासात 2 वर्धापन दिन साजरे होणार; सभेचं मैदान कोण गाजवणार? शिंदे की ठाकरे?

या घटनेनंतर आता पुणे पीएमपीएमएलमध्ये नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न विचारला जात आहे. या घटनेमुळे पुणेकरांनी संताप व्यक्त केला आहे. मार्च महिन्यात पुण्यात अशीच घटना घडली होती. मद्यपी चालकाने स्वारगेट ते सांगोला बस सुसाट चालवली होती. तब्बल 62 किलोमीटरपर्यंत या चालकाने ही बस सुसाट चालवली होती. शेवटी प्रवाशांनी आरडाओरडा केला आणि चालकाला बस थांबवण्यास भाग पाडले. त्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला होता.

Pune PMPML Bus
Sanjay Raut News: मणिपूरमध्ये मोदींच्या 'मन की बात'ला विरोध, लोकांनी रेडिओ फोडले; राऊंतांनी VIDEO ट्वीट करत डिवचलं

दरम्यान, पुण्यामध्ये एसटी चालक संतोष माने याने 9 जणांना बसखाली चिरडले होते. 25 जानेवारी 2012 रोजी ही घटना घडली होती. त्याने स्वारगेट डेपोतील एसटी बस ताब्यात घेत भरधाव वेगाने चालवत 9 जणांना चिरडले होते. या घटनेत 37 जण जखमी झाले होते. शिवाजीनगर कोर्टात वर्षभर खटला चालला होता आणि 8 एप्रिल 2013 रोजी संतोष मानेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.