Tomato Price Hike: राज्यात मान्सून लांबल्यामुळे भाजीपाल्याचा दरावर परिणाम; बाजारात टोमॅटोचे दर चारपट वाढले

Tomato BajarBhav: धाराशिवातील बाजारात टॉमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत
Tomato
TomatoSaam TV
Published On

बालाजी सुरवसे

Tomato Price In Maharashtra: जून महिना अर्ध्याहून अधिक उलटला तरी राज्यात मोसमी पावसाचं आगमन झालेलं नाही. रखडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. राज्यातील मान्सून लांबल्याने भाजीपाल्याच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. यामुळे धाराशिवातील बाजारात टॉमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. (Latest Marathi News)

मान्सून लांबल्यामुळे भाजीपाल्याच्या आवक कमी झाली आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या उत्पन्नावर चांगलाच परिणाम झाल्याची परिस्थिती धाराशिवमधील बाजार पेठेत पाहायला मिळत आहे. मे महीन्यात किरकोळ बाजारात ५ ते १० रूपये किलोने विक्री होणारे टोमॅटो सध्या ५० ते ६० रुपये किलो दराने विक्री होत आहेत.

Tomato
Monsoon 2023 Update : राज्यात मान्सून कधीपासून सक्रिय होणार? हवामान विभागाची नवी अपडेट, वाचा सविस्तर

सध्या ठोक बाजारात शेतकऱ्यांना १३ ते ३० रुपये किलोप्रमाणे भाव मिळत आहे. तर किरकोळ बाजारात ५० ते ६० दर मिळत आहे. मागील सहा महिन्यांपासून किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर ५ ते १५ रुपयांवर स्थिरावले आहेत. परंतु या वर्षी जून महीन्यात टोमॅटोचे दर चांगलेच वाढले आहेत. उकाड्यामुळे फुलगळती झाल्याने टोमॅटोच्या दरात चारपट वाढ झाल्याचे समोर आले आहे.

Tomato
Heat Wave: कडक सूर्य, तीव्र उष्णता... 10 राज्यांमध्ये उष्णतेची लाट; आयएमडीचा इशारा

राज्यात पाऊस केव्हा सक्रिय होणार?

राज्यात बिपरजॉय वादळाचा प्रभाव कमी झाला आहे. येत्या तीन दिवसांत मान्सून राज्यात सक्रिय होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 23 जूनपासून मान्सून आणखी सक्रिय होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना आणखी काही दिवस पावसाची वाट पाहावी लागणार आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com