Monsoon 2023 Update : राज्यात मान्सून कधीपासून सक्रिय होणार? हवामान विभागाची नवी अपडेट, वाचा सविस्तर

Monsoon news : बिपरजॉय वादळामुळे मान्सूनला फटका बसला आहे.
Monsoon 2023
Monsoon 2023SaamTv

Weather Forecast : जून महिना अर्ध्याहून अधिक उलटला तरीही मान्सून राज्यात सक्रीय झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. बहुतांश भागात पेरण्या रखडल्या आहे. तर दुसरीकडे उन्हाचा तडाखाही वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना मान्सूनची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत.

बिपरजॉय वादळामुळे मान्सूनला फटका बसला आहे. मान्सून 11 जून रोजी कोकणात दाखल झाला मात्र बिपरजॉय वादळामुळे त्याची पुढील वाटचाल बिघडली. मात्र आता बिपरजॉय वादळाचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे मान्सूनसाठी राज्यात अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे.

येत्या तीन दिवसांता मान्सून उर्वरीत महाराष्ट्रात सक्रीय होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 23 जूनपासून मान्सून आणखी सक्रिय होईल. त्यामुळे मुसळधार पावसासाठी आणखी काही तास नागरिकांना वाट पाहावी लागणार आहे. (Latest Marathi News)

Monsoon 2023
Heat Wave: कडक सूर्य, तीव्र उष्णता... 10 राज्यांमध्ये उष्णतेची लाट; आयएमडीचा इशारा

उष्णतेच्या लाटेचा इशारा

एकीकडे नागरिक पावसाची वाट पाहत असताना हवामान विभागाने राज्यात पुढील चार दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. विदर्भात ही उष्णतेची लाट येण्याचा अंदात हवामान विभागाने दिला आहे. तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह‌ पावसाची शक्यता आहे.

Monsoon 2023
Traffic Rules : बाइकची चावी काढण्याचा अधिकार वाहतूक पोलिसांना नाही; न्यायालयाने आदेशात काय म्हटलंय?

मान्सून लांबल्यामुळे भाजीपाल्याच्या आवक कमी झाली असून उत्पन्नावर चांगलाच परिणाम झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजीपाल महाग झाल्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. मान्सून लांबल्याचा फटका उडीद, मुग, सोयाबीन पिकांच्या उत्पादनावर होण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com