पुणे जिल्हयात दिवाळीनिमित्त स्थानिक सुट्टीच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. याआधी 6 नोव्हेंबर 2026 रोजी धनत्रयोदशीनिमित्त जाहीर करण्यात आलेली स्थानिक सुट्टी आता सोमवार 9 नोव्हेंबर 2026 रोजी असणार आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी सुधारित आदेश जारी केले आहेत. पुणे जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांसाठी स्थानिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र या सुट्ट्यांच्या वेळापत्रकात सुधारणा करत दिवाळीनिमित्त 9 नोव्हेंबर रोजी स्थानिक सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य शासनाच्या राजनैतिक सेवा विभागाच्या निर्णयानुसार आणि सामान्य प्रशासन विभागाच्या 14 मार्च 1983 रोजीच्या अधिसूचन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी हे सुधारित आदेश जारी केले आहेत. यापूर्वी ६ नोव्हेंबर रोजी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. आता ही सुट्टी ९ नोव्हेंबर रोजी लागू होणार आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांनी सुधारित आदेशानुसार सुट्टीच्या तारखेत झालेल्या बदलाची नोंद घ्यावी.
हा आदेश पुणे जिल्ह्यातील संबंधित शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांसाठी जाहीर करण्यात आलेल्या स्थानिक सुट्टीसंदर्भात आहे. याला राज्यभरातील सर्व कार्यालयांसाठी लागू असलेली स्वतंत्र सार्वजनिक सुट्टी समजू नये.
दरम्यान राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील सत्र आणि सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. राज्याच्या शिक्षण विभागाकडून यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या परिपत्रकानुसार, विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टीसह दिवाळीची सुट्टीही मिळणार आहे. राज्यातील सर्व शाळांना ३ मे ते १४ जून २०२७ या कालावधीत उन्हाळी सुट्टी लागू राहणार आहे. विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी ४३ दिवसांचा कालावधी मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद घेता येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.