Pune : पुण्यात वाहतुकीत मोठा बदल! 'या' महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक २ तास राहणार बंद; पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या

Pune Dive Ghat News : पुण्यातील दिवे घाटातील वाहतूक आज दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी ब्लास्टिंग होणार असून वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.
Pune Traffic News
Pune Traffic News AI Image
Published On
Summary
  • पुण्यातील वाहतुकीत मोठा बदल

  • आज दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत दिवे घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार

  • हडपसर ते दिवे घाट रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी ब्लास्टिंग

  • पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या मार्गांपैकी एक असलेल्या दिवे घाटातील वाहतूक आज दुपारी दोन तासांसाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गाअंतर्गत हडपसर ते दिवे घाट या दरम्यान सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी ब्लास्टिंग करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतूक विभागाने या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत दिवे घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. या दोन तासांच्या कालावधीत रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी आवश्यक असलेले ब्लास्टिंग करण्यात येणार आहे. ब्लास्टिंगदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि वाहनचालक तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी वाहतूक थांबवण्यात येणार आहे.

Pune Traffic News
Sleeping Position : डावी की उजवी कुशी? झोपण्याची कोणती पोझिशन आरोग्यसाठी आहे बेस्ट, जाणून घ्या

हडपसर ते दिवे घाट या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. त्यामुळे दुपारच्या वेळेत या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी आणि वाहनचालकांनी आज विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुपारी १२ ते २ या वेळेत दिवे घाटाकडे जाणे टाळावे, तसेच शक्य असल्यास प्रवासाचे नियोजन त्यानुसार करावे, असे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Pune Traffic News
Weather Update : मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु होणार, आज 'या' जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस; वाचा हवामानाचा अंदाज

दरम्यान, या कालावधीत दिवे घाट परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे. प्रवासाला निघण्यापूर्वी वाहनचालकांनी मार्गाची सद्यस्थिती तपासून त्यानुसार प्रवासाचे नियोजन करणे आवश्यक आहे. रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. मात्र, कामाच्या काळात नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी वाहतूक विभागाकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे आज दुपारी १२ ते २ या वेळेत दिवे घाटातून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी वाहतूक बंदची नोंद घेऊन पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com