Pune Dam Water Level Today: पुण्याचा पाणीप्रश्न सुटणार? धरणांमध्ये किती आहे पाणीसाठा?

Pune Dam Water Level Today: गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणसाठ्यातील पाणी पातळीत वाढ झाली आहे.
Pune Dam Water Level Today
Pune Dam Water Level TodaySaam tv
Published On: 

सचिन जाधव, रोहिदास गाडगे, दिलीप कांबळे

Pune News: गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यातील नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे. तर दुसरीकडे पुण्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणसाठ्यातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. (Latest Marathi News)

पुण्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र, पुणेकर अद्याप चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. गेले दोन-तीन दिवस शहर आजूबाजूच्या परिसरात पडत असलेल्या पावसामुळे येणाऱ्या काही पुणेकरांचा पाणीप्रश्न मिटणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे .

Pune Dam Water Level Today
Maharashtra Rain: मुंबई, ठाण्यासह कोकणात आज तुफान पावसाची शक्यता; 'या' जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट

खडकवासला धरण साखळीत काल संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या २४ तासात सुमारे एक टीएमसी पाणी जमा झालेले आहे. तर पानशेत धरणात ५० टक्के म्हणजे ५.३४ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे.

२१ जुलै २०२३ संध्याकाळी पाच वाजताची स्थिती

धरणाचे नाव / एकूण क्षमता(टीएमसी)/ उपयुक्त पाणीसाठा(टीएमसी) / टक्केवारी

खडकवासला- १.९७/ १.१९/ ६०.२६

पानशेत- १०.६५/ ५.३४/ ५०.१४

वरसगाव- १२.८२/ ६.१२/ ४७.७३

टेमघर- ३.७१/ १.१६/ ३१.३१

चार धरणातील एकूण क्षमता - २९.१५ टीएमसी

आजचा एकूण उपयुक्त पाणीसाठा - १३.८१ टीएमसी / ४७.३७टक्के

Pune Dam Water Level Today
Maharashtra Landslide: माळीण, तळीये, इर्शाळवाडी… यापुढे काय? राज्यातील 1 हजार गावांवर मृत्यूची टांगती तलवार

पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांची स्थिती काय?

भिमाशंकरच्या परिसरात पाऊसाची संततधार कायम सुरु आहे. मात्र अजूनही धरण क्षेत्रात मुसळधार पाऊसाची प्रतिक्षाच आहे. कुकडी प्रकल्पातील पाच आणि भिमा भामा खोऱ्यातील दोन धरणांमध्ये मागच्या वर्षाच्या तुलनेत अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याची चिंता वाढली आहे.

सह्याद्री कुशीतल्या घाटमाथ्यावर पाऊसाची संततधार सुरु असली तरी धरणाच्या पाणी साठ्यात येणारे पाणी अत्यल्प असल्याने पाणी पातळी वाढत नाही.

डिंभे धरणात आज 32.87 टक्के पाणीसाठा आहे. तर गेल्या वर्षी 65.51 टक्के पाणीसाठा होता.

माणिकडोह धरणात आज 25.82 टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी 50.37 टक्के पाणीसाठा होता.

वडज धरणात 51.33 टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी 76.20 टक्के पाणीसाठा होता.

पिंपळगाव जोगे धरणात 0 टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी 54.35 टक्के पाणीसाठा होता.

येडगाव धरणात 31.78 टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी 91.20 टक्के पाणीसाठा होता.

घोड धरणात 0 टक्के पाणीसाठा आहे . गेल्या वर्षी 78.04 टक्के पाणीसाठा होता.

भामाअसखेड धरणात 48.16 टक्के आहे. गेल्या वर्षी 86.13 टक्के पाणीसाठा होता.

चासकमान धरणात 48.00 टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी 97.92 टक्के पाणीसाठा होता.

आजचा एकूण उपयुक्त पाणीसाठा १३.८१ टीएमसी / ४७.३७टक्के

Pune Dam Water Level Today
Kolhapur Gold Biscuits News: तळ्याकाठी खेळताना मुलांना सापडली सोन्याची बिस्किटं; किंमत पाहून पोलिसही चक्रावले

पावसाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक लोणावळ्यात

दरवर्षी पावसाळ्यात निसर्ग मावळ तालुक्याला भरभरून देत असतो. सर्वत्र धुक्याची चादर पसरली आहे. या ठिकाणी आता वर्षा विहार आणि या आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक देखील गर्दी करू लागले आहेत.

लोणावळ्यात विक्रमी पावसाची नोंद होत आहे. मात्र तरी देखील या पावसात भिजण्यासाठी पर्यटक लोणावळ्यात येताना दिसून येत आहेत. पावसामुळे भुशी धरणवरील पाण्याचा वेग देखील वाढला आहे. मात्र तरी देखील पर्यटक भुशी धरणावर गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com