Maharashtra Rain: मुंबई, ठाण्यासह कोकणात आज तुफान पावसाची शक्यता; 'या' जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट

Mumbai Heavy Rain: हवामान खात्याने पावसासंदर्भात मोठी अपडेट दिली आहे. पुढील ४८ तासांत राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर वाढणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
Maharashtra Rain News Weather Updates Mumbai Heavy Rain
Maharashtra Rain News Weather Updates Mumbai Heavy RainSaam TV
Published On

Maharashtra Rain Alert: गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. पावसामुळे नद्या नाल्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. दुबार पेरणीचं संकट टळलं असलं तरी, सततच्या पावसामुळे पिके वाहून जाण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे पाऊस कधी थांबणार? याची वाट शेतकरी पाहत आहेत.

Maharashtra Rain News Weather Updates Mumbai Heavy Rain
Jalna News: जीव देण्यासाठी तरुण थेट रुळावर उभा राहिला, समोरून भरधाव ट्रेन आली अन्... जालन्यातील धक्कादायक VIDEO

अशातच हवामान खात्याने पावसासंदर्भात मोठी अपडेट दिली आहे. पुढील ४८ तासांत राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर वाढणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याने पालघर, ठाणे, रायगड, सातारा जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिला आहे.

या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. याशिवाय कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट क्षेत्रांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. तर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या चार जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Maharashtra Rain News Weather Updates Mumbai Heavy Rain
Ajit Pawar News: मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की... बड्या नेत्याचं ट्वीट व्हायरल

दुसरीकडे मुंबईसह उपनगरात गेल्या आठवडाभरापासून जोरदार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं असून काही ठिकाणी रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे चाकरमान्यांना कामावर निघताना मोठी अडचणी होत आहे.

शुक्रवारी दुपारी १२ नंतर मुंबई शहर, तसेच उपनगरांत पावसाचा जोर वाढला. मुंबईतील कुर्ला, चेंबूर, विक्रोळी, अंधेरी परिसरात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे सखलभाग जलमय झाले आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाली. त्याचबरोबर हार्बर मार्गावरही पाणी साचल्याने काही काळ लोकलचा खोळंबा झाला. आता मुंबईसह ठाण्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com