Pune Cyber Fraud News: पुण्यात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट! ऑनलाइन जॉब देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाला घातला १ कोटींचा गंडा

Cyber Fraud News: फाइव स्टार रेटिंग मिळवून द्या आणि कमिशन घ्या अशी ऑफर देण्यात आली होती.
Pune Fraud News
Pune Fraud NewsSaamtv
Published On: 

अक्षय बडवे, प्रतिनिधी...

Fraud News: पुणे शहरात ऑनलाईन फसवणूकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अशा अनेक घटना समोर आल्या असून एका जेष्ठ नागरिकाची तब्बल एका कोटींची फसवणूक केल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी 56 वर्षीय व्यक्तीने सायबर पोलिसात फिर्याद दिली आहे. (Latest Marathi News)

Pune Fraud News
Wrestlers Protest Latest Update: कुस्तीपटूंची 'मेडल वापसी', दिल्ली पोलिसांशी झालेल्या झटापटीनंतर विनेश फोगाटची घोषणा

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांचा पुण्यातील (Pune News) बावधन भागात फिल्म मेकिंगचा व्यवसाय आहे. त्यांची मीरा पटेल आणि सुधा चौहान या टेलिग्राम धारकांशी ओळख झाली. आम्ही सीटी एम ट्रॅव्हल कंपनीचे प्रतिनिधी असून प्रवासी ठिकाणांसाठी फाइव स्टार रेटिंग मिळवून द्या आणि कमिशन घ्या अशी ऑफर देण्यात आली होती. या आमिषाला बळी पडून या ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःच्याच दहा ते बारा बँक खात्यावरून समोरील व्यक्तींच्या अनेक खात्यांवर टप्प्याटप्प्याने विविध रक्कम जमा केल्या.

Pune Fraud News
Kolhapur Accident News: सुट्टीवर आलेल्या जवानाचा पहिल्याच दिवशी अपघाती मृत्यू; संपूर्ण गावावर शोककळा

हा सगळा प्रकार सप्टेंबर 2022 पासून सुरू होता. ऑनलाइन रिव्ह्यू देऊन सुद्धा आपल्याला कुठलाच कमिशन मिळत नसल्याचे लक्षात आल्यावर या ज्येष्ठ नागरिकाने सायबर पोलिसात धाव घेत सायबर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी टेलिग्रामधारक चॅनेलवर गुन्हा दाखल केला असून पोलिस अधिक तपास करत आहेत. (Fraud)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.