Kolhapur Accident News: सुट्टीवर आलेल्या जवानाचा पहिल्याच दिवशी अपघाती मृत्यू; संपूर्ण गावावर शोककळा

Kolhapur Accident News: मनसु धोंडीराम माणगुतकर असं जवानाचं नाव आहे.
Kolhapur News
Kolhapur News Saam TV

Kolhapur News : कोल्हापुरात रस्ते अपघतात जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा राज्य मार्गावर ही घटना घडली आहे. तावरेवाडीजवळ हा अपघात झाला आहे.

मनसु धोंडीराम माणगुतकर असं जवानाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार मनसु हे काही दिवसांसाठी सुट्टीवर आपल्या गावी आले होते. मनसु यांच्या गाडीला कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा राज्य मार्गावर किनी गावच्या हद्दीत भीषण अपघात झाला. त्यांची भरधाव कार झाडाला धडकली. (Latest News)

Kolhapur News
Chhattisgarh Accident News: ट्रक आणि बोलेरो कारचा भीषण अपघात, लग्नाहून परतणाऱ्या एकाच कुटुंबातील 11 जणांचा मृत्यू

या भीषण अपघातात मनसु माणगुतकर यांचा जागीच मृत्यू झाला. नेसरी आणि आजरा पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला. मात्र सुट्टीवर आलेल्या जवानाचा पहिल्याच दिवशी अपघाती मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. (Kolhapur News)

Kolhapur News
Solapur News: अधिकारीच ठरला मास्टरमाईंड! साताऱ्याहून २ कंटेनर पुण्यात पाठवले, तपासणी करताना पोलिसही हादरले; नेमकं काय घडलं?

अंबरनाथमध्ये लग्न समारंभाहून गाडीला अपघात

अंबरनाथ एमआयडीसीत एका टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत कार चालक सोमनाथ भंगारे यांचा जागीच मृत्यू झाला. तर मालू भंगारे आणि तुलसी भंगारे हे दोघे गंभीर जखमी झाले. या सर्वांना तातडीने उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आले आहे. रुग्णालयात मालू आणि तुलसी भंगारे यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना उपचारांसाठी थेट मुंबईला हलवण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com