Solapur News: अधिकारीच ठरला मास्टरमाईंड! साताऱ्याहून २ कंटेनर पुण्यात पाठवले, तपासणी करताना पोलिसही हादरले; नेमकं काय घडलं?

Solapur News Update | या कारवाईत २ कंटेनर भरून गुटखा आणि सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आली आहे.
Solapur News
Solapur NewsSaamtv
Published On

Solapur News: राज्यात गुन्हेगारी घटना वाढत असताना सोलापूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांना एका ट्रकबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून कारवाई केली असता असा काही खुलासा झाला पोलिसही थक्क झाले. पोलिसांच्या तपासात सोलापूरचे अन्न - औषध अधिकारीच यामध्ये मुख्य आरोपी असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

Solapur News
Cyclone Mocha : अस्मानी संकट! नांदेडमध्ये मोचा चक्रीवादळाचा कहर; गोठा कोसळल्याने जनावरे दगावली

याबाबत अधिक माहिती अशी की, सांगली तालुक्यातील कवठे महाकाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत १ कोटी १७ लाखांचा गुटखा पोलिसांनी पकडला आहे. या कारवाईत २ कंटेनर भरून गुटखा आणि सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आली आहे. सांगली पोलीस आणि सांगली एलसीबी पथकाने या कारवाईत कंटेनरमधील तिपुरय्या बमनोळी, बसवेश्वर कटीमणी,श्रीशैल्य हाळके यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

या ३ संशयित आरोपींकडे अधिक तपास केला असता हा सर्व मुद्देमाल सोलापुरातील अन्न - औषध प्रशासन अधिकारी प्रशांत कुचेकर यांचा असल्याचे कबुली जबाबात दिले. तसेच पंकज दत्तात्रय तुरेकर, दर्शन तुरेकर,रोहित पटाले यांचा देखील असल्याची माहिती समोर आली आहे.या अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून हा गुटखा आणि सुगंधित तंबाकू कर्नाटकातून सातारा मार्गे पुणे जिल्ह्यात घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.

Solapur News
Vita - Mahabaleshwar Highway : विटा- महाबळेश्वर महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील चाैघे ठार

यावरून कवठेमहाकाळ पोलीस ठाण्यात या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत कुचेकर हे सोलापुरातील अन्न व औषध कार्यालयात निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. गुटखा प्रतिबंधक कार्यालयात काम करणारा अधिकारी गुटखा किंग असल्याची माहिती समोर आल्याने सोलापुरात या प्रकरणाची सध्या चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com