Wrestlers Protest Latest Update: कुस्तीपटूंची 'मेडल वापसी', दिल्ली पोलिसांशी झालेल्या झटापटीनंतर विनेश फोगाटची घोषणा

Bajrang Punia: कुस्तीपटूंची 'मेडल वापसी', कुस्तीपटूंना अशीच वागणूक दिली जाईल, तर पदकांचे काय करणार : बजरंग पुनिया
Wrestlers Protest Update
Wrestlers Protest Update Saam Tv
Published On

Wrestlers Offer to Return Medals: कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषणशरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) आणि दिल्ली (Delhi) पोलिसांविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंमध्ये बुधवारी रात्री झटापट झाली. यानंतर विरोध करणारे कुस्तीपटू अधिकच खवळले आहेत. यातच आता बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट या कुस्तीपटूंनी जिंकलेली पदके सरकारला परत करणार असल्याचेही सांगितले.

बजरंग पुनिया म्हणाला की, ''कुस्तीपटूंना अशीच वागणूक दिली जाईल, तर पदकांचे काय करणार? त्यापेक्षा आम्ही सामान्य जीवन जगू आणि सर्व पदके आणि पुरस्कार भारत सरकारला परत करू.'' त्याच्यापाठोपाठ विनेश फोगाटनेही पदक परत करणार असल्याचं म्हटलं अहे.

Wrestlers Protest Update
Army Helicopter crashed: मोठी बातमी! जम्मू- काश्मिरमध्ये सैन्यदलाचे विमान कोसळले; २ पायलट जखमी

नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणारे कुस्तीपटू आणि दिल्ली पोलिसांमध्ये बुधवारी रात्री झटापट झाली. पोलिसांशी झालेल्या झटापटानंतर विनेश फोगट रडू लागली. विनेश फोगाट म्हणाली की, ''इतके घोटाळे करणारे ब्रिजभूषण सुखाने झोपले आहेत. आम्ही झोपण्यासाठी बेड आणल्यावर त्यावरही हल्ला झाला. हा दिवस पाहण्यासाठी पदक आणले होते का? असा दिवस पाहायचा असेल तर देशासाठी कोणी पदक आणू नये, असे मला वाटते.'' (Latest News)

ती पुढे म्हणाली की, ''आम्ही आमच्या सन्मानासाठी लढत आहोत आणि त्यानंतरही धर्मेंद्र नावाचा एक पोलीस आम्हाला धक्काबुक्की करत होता. आम्ही भाकरीही खाल्ली नाही आणि इथेच अडकलो आहोत. आम्हाला मारायचेच असेल तर असेच मारून टाका. आम्ही मरायला तयार आहोत.'' पोलिसांच्या हल्ल्यात तीन कुस्तीपटू गंभीर जखमी झाल्याचे विनेश फोगटने सांगितले.

Wrestlers Protest Update
Jonty Rhodes Viral Video: भावा जिंकलस! जॉन्टी रोड्सवर मैदानातील छोट्याशा कृतीमुळे कौतुकाचा वर्षाव

Wrestlers Protest : दिल्ली पोलीस सतर्क, यूपी-हरियाणामधून लोक येऊ शकतात

दिल्ली पोलिसांनी सर्व जिल्ह्यांच्या डीसीपींना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. विशेषत: सीमाभागावर लक्ष ठेवा कारण मोठ्या संख्येने लोक येऊ शकतात. मध्य दिल्लीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर बॅरिकेडिंग करण्यात आली अहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, त्यांना असे इनपुट मिळाले आहे की मोठ्या संख्येने लोक जंतर मंतरकडे जाऊ शकतात, जिथे कुस्तीपटू धरणे आंदोलन करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com