Pune Crime: पुणे हादरले! अण्णाभाऊ साठेंच्या जयंती दिवशी रक्तरंजित थरार, मिरवणुकीत टोळक्याने तरुणाला संपवलं

Pune Police: पुण्यामध्ये भरचौकात तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. टोळक्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करत तरुणाला जागीच संपवलं.
Pune Crime: पुणे हादरले! अण्णाभाऊ साठेंच्या जयंती दिवशी रक्तरंजित थरार, मिरवणुकीत टोळक्याने तरुणाला संपवलं
Pune Crime NewsSaam Tv
Published On
  • पुण्यात अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत तरुणाची हत्या

  • डीजेवरून झालेल्या वादातून घडली हत्याकांडाची घटना

  • हत्येप्रकरणी १० जणांना पोलिसांनी केली अटक

  • पर्वती पोलिसांकडून तपास सुरू

सचिन जाधव, पुणे

पुण्यामध्ये हत्याकांडाची भयंकर घटना घडली. सिंहगड रोड परिसरात भरचौकात तरुणाची मारहाण करत निर्घृण हत्या करण्यात आली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिवशी ही हत्याकांडाची घटना घडल्यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली. एरियाच्या वादावरून टोळक्याने तरुणाला जागीत संपवलं. या प्रकरणी पोलिसांनी १० जणांना अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये डीजेवर नाच्यावरून वाद झाला होता. अल्पवयीन आरोपींसह इतर १० जणांनी तरुणावर जीवघेणा हल्ला केला. १५ आरोपींनी भरचौकात तरुणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Pune Crime: पुणे हादरले! अण्णाभाऊ साठेंच्या जयंती दिवशी रक्तरंजित थरार, मिरवणुकीत टोळक्याने तरुणाला संपवलं
Kalyan Crime: कल्याण हादरले! डोक्यावर वार करत तरुणीने बॉयफ्रेंडला संपवलं, मृतदेह गोणीत भरून २४ तास पाण्यात ठेवला

शुभम राजू घोडके (वय २२ वर्षे) या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जुना वाद डोक्यात धरून १५ जणांच्या टोळक्याकडून जबर मारहाण करण्यात आली. पर्वती पोलिस ठाण्यात १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी ५ अल्पवयीन आरोपींसह एकूण १० जणांना अटक केली.

Pune Crime: पुणे हादरले! अण्णाभाऊ साठेंच्या जयंती दिवशी रक्तरंजित थरार, मिरवणुकीत टोळक्याने तरुणाला संपवलं
Cyber Crime : मुंबईत 'म्युल अकाउंट' रॅकेटचा पर्दाफाश; ७ जण अटकेत, १० लाखांची रोकड जप्त

पोलिसांनी सांगितले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त डीजेवर नाचण्यावरून पुण्यातील आंबेगाव पठार आणि तुकाई नगर या दोन परिसरातील टोळक्यांमध्ये वाद झाला होता. याच वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झालं. शुभम घोडके या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाला. पर्वती पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com