Pune Crime News: पुण्यात अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; येरवडा मनोरुग्णालयातील धक्कादायक घटना

Pune Crime: पीडित मुलाच्या आईने पोलिसांत या बाबत तक्रार दाखल केली आहे.
Pune Crime News
Pune Crime NewsSaam TV
Published On: 

Crime News: पुण्यातील येरवडा मनोरुग्णालयातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करण्याता आलाय. पीडित मुलाच्या आईने पोलिसांत या बाबत तक्रार दाखल केली आहे. या घटनेनं मनोरुग्ण कैद्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिला आहे. (Latest Crime News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पीडित तरुण खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी बाल सुधारगृहात होता. मानसिक स्थिती बरी नसल्याने त्याला मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी संशयित आरोपी याला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्यालाही १.५ वर्षांपूर्वी मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Pune Crime News
Parbhani Crime News: पहिलीच्या प्रवेशासाठी लाच घेतली, एसीबीची लिपिकासह मुख्याध्यापकावर कारवाई

पीडित मुलाला उपचारानंतर सोडण्यात आले. त्यानंतर कोल्हापूर येथील शाळेत (School) प्रवेश घेण्यासाठी त्याला त्याची आई घेऊन गेली. त्याने डावा हात दुखत असल्याची तक्रार आईकडे केली. डॉक्टरांकडे नेले असता त्याचा हाताचा एक्स रे काढण्यात आला. तेव्हा त्याच्या हातावर १८ ठिकाणी सुया टोचल्याचे दिसून आले.

यावेळी मुलाची चौकशी करण्यात आली. तेव्हा येरवडा मनोरुग्णालयात असलेल्या एकाने लैंगिक अत्याचार केल्याची माहिती त्याने दिली. त्यानंतर पीडित मुलाच्या आईने येरवडा पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. मुलाबरोबर घडलेल्या घटनेमुळे आई-वडलांकडून संताप व्यक्त केला जात आहे. पोलिस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

Pune Crime News
Ahmednagar Crime News: मुली ओरडत होत्या अन्.. भररस्त्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग; रुपाली चाकणकरांनी शेअर केला व्हिडिओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com