Ahmednagar Crime News: मुली ओरडत होत्या अन्.. भररस्त्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग; रुपाली चाकणकरांनी शेअर केला व्हिडिओ

अल्पवयीन मुलीची छेड काढून तिला मारहाण केल्याची घटना रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली.
Ahmednagar Viral Video
Ahmednagar Viral Video Saamtv
Published On

Ahmednagar Crime News: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील गुन्हेगारी घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. काही दिवसांपुर्वीच पुण्यातील (Pune Crime) सदाशिव पेठ परिसरात भरदिवसा तरुणीवर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला. ज्यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती.

ही घटना ताजी असतानाच नगरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नगरमध्ये भरदिवसा अल्पवयीन मुलीची छेड काढण्याचा प्रकार घडला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्हिडिओ ट्वीट केला असून कारवाईच्या सुचना दिल्या आहेत.

Ahmednagar Viral Video
After Ajit Pawar Rebel's: 'मला शरद पवार यांची मनापासून माफी मागायची आहे'; अजित पवारांना साथ देणारा आमदार भावुक

काय आहे संपूर्ण प्रकरण?

याबाबत अधिक माहिती अशी की, अल्पवयीन शाळकरी मुलीची भरदिवसा छेड काढण्यात आल्याची घटना अहमदनगरमध्ये घडली आहे. अहमदनगरच्या (Ahmednagar) पाथर्डी तालुक्यातील तिसगावमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. अल्पवयीन मुलीची छेड काढून तिला मारहाण केल्याची घटना रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली.

बसस्थानकाजवळच आरोपीने दोन बहिणींची छेडछाड केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral) झाला होता. ज्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी रफिक उर्फ लाल्या मुनीर पठाण याला ताब्यात घेतले आहे. या संपूर्ण प्रकाराची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनीही दखल घेतली असून कडक कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

Ahmednagar Viral Video
Haribhau Rathod Statement: शिंदेचे सरकार खाली खेचून फडणवीस स्वतः मुख्यमंत्री होतील; माजी खासदार हरिभाऊ राठोड

काय म्हणाल्या रुपाली चाकणकर...

या ट्वीटमध्ये त्यांनी, "अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव शहरमध्ये भर रस्त्यात मुलींची छेडछाड केली जात असल्याचा व्हिडिओ वायरल होत आहे. भरदिवसा रस्त्यात मुलींना असा त्रास देण्याचा प्रकार गंभीर आणि मुलींच्या सुरक्षितेच्या दृष्टीने चिंताजनक असल्याचे म्हणले आहे.

तसेच या व्हिडीओची दखल घेत राज्य महिला आयोगाने पोलिस अधीक्षक, अहमदनगर यांना तातडीने चौकशी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असल्यचेही त्यांनी सांगितले आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com