Crime News : लष्करात नोकरीच्या बहाण्याने लाखो रुपयांची फसवणूक, नकली आर्मी ऑफिसर अटकेत

Fake Army Officer : लष्करात भरती करण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Crime News
Crime NewsSaam Tv
Published On: 

Pune Crime News :

लष्करात भरती करण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आर्मी ऑफिसर आहे असे सांगून ही फसवणूक केली आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. घडलेल्या प्रकाराने फसवणूक झालेल्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

रणजित कुमार राजेंद्र सिंग असे आरोपीचे नाव आहे. हा कोईम्बतूर, तामिळनाडू येथे राहत होता. आर्मी इंटेलिजेन्समध्ये काम करत असल्याचे आरोपीने सांगितले होते. आर्मी ऑफिसर म्हणून एसओसी सिंकदराबाद येथे भरती करतो असे सांगून बनावट नियुक्ती पत्र आणि स्वतः चे बनावट आयडी कार्ड दाखवून फसवणूक केली आहे.

Crime News
MLA Disqualification Case: आमदार अपात्रतेप्रकरणाचं वेळापत्रक म्हणजे नार्वेकरांचं वेळकाढूपणा; अनिल परब

या प्रकरणात आरोपीने तब्बल १२ लाख ८० हजार रोख रक्कम आणि ऑनलाइन स्वरुपात पैसे वसूल केले. याबाबत वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानंतर आरोपीला कोंढवा परिसरातून अटक करण्यात आली.

आरोपीकडे तीन एअर गन आणि त्याचे कॅप्सूल, आर्मीचे बनावट ओळखपत्र, आर्मीचा गणवेश, आर्मीचे बनावट रबरी स्टॅम्प, लॅपटॉप, बनावट सर्व्हिस सेवा पत्र, पेनड्राइव्ह, मोबाईल आणि इतर साहित्य सापडले. एकूण १ लाख ६ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

या प्रकरणात अजून कोणाचीही फसवणूक झाली असल्यास वानवडी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहान पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Crime News
Kalyan Crime: धक्कादायक! पैसे देण्यास नकार दिल्याने हॉटेलच्या कॅशिअरला बेदम मारहाण; दोन जणांना अटक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com