शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाच्या सुनावणीचं वेळापत्रक ठरलं आहे. शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट या पक्षातील विधानसभा अध्यक्षांकडून सुनावणीचे पुढील वेळापत्रक ईमेलद्वारे पाठवण्यात आले आहे. मात्र या वेळापत्रकावर ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात आलाय. आमदार अपात्रतेप्रकरणी नार्वेकरांचे वेळापत्रक म्हणजे वेळकाढूपणा असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केली आहे. (Latest News on Politics)
मुंबई झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना अनिल परब म्हणाले की, हे वेळापत्रक हे एक धूळफेक आहे. सर्वोच्च न्यायालयानं खडसावल्यानंतरही तारखांवर तारखा ठरवण्यात येत आहेत. आम्ही एक प्रतिज्ञापत्र दिलंय. पुरावे पाहण्याची गरज नाही. वेगवेगळी सुनावणी घेण्याची गरज नाही. नोव्हेंबर २३ तारखेपर्यंतच्या तारखा कळवल्या आहेत. त्यानंतर उलट तपासणी सुरू होणार आहे. परंतु उलट तपासणी किती वेळ चालणार काही माहिती नाही.
एक महिन्याच्या कालावधीत हे प्रकरण संपवायला हवे. आतपर्यंत निकाल लागला पाहिजे होता. मात्र आमदार अपात्र होतील यामुळे वेळकाढूपणा केला जातोय. सर्वोच्च न्यायालयात जेव्हा हे टाईमटेबल दिलं जाईल त्यावेळी आम्ही आमची बाजू मांडू. अपात्रतेची सुनावणी नोव्हेंबरपर्यंत चालणार असून सर्व याचिकांवरील सुनावण्यात एकत्रित घ्यायच्या की नाही, याबाबत २० ऑक्टोबरला मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.
विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांना वेळापत्रक पाठवण्यात आले आहे. मात्र या वेळापत्रकावर ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात आलाय. सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घेतल्यास अंतिम सुनावणीसाठी एवढा वेळ का? असा सवाल ठाकरे गटाने उपस्थित केलाय. त्यामुळे पुढील सुनावणीमध्ये ठाकरे गट विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकावर ठाकरे गट आक्षेप घेणार आहेत.
दरम्यान १३ ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबरदरम्यान युक्तिवाद होणार आहे तर २३ नोव्हेंबरनंतर दोन आठवड्यात अंतिम सुनावणी होईल. दरम्यान २५ सप्टेंबरला झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाच्या वतीने सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्या, अशी मागणी करण्यात आली. तर या सर्वांना स्वतंत्र पुरावा द्यायचा असल्याने त्याची वेगवेगळी सुनावणी घ्यावी, अशी मागणी शिंदे गटाच्या वतीने करण्यात आली होती. या सर्व गोष्टींचा विचार करून विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीचे वेळापत्रक निश्चित केले आहे. सर्व आमदारांना हे वेळापत्रक आज सकाळी पाठवण्यात आलं.
वेळापत्रकावर आक्षेप घेतल्यानंतर अनिल परब यांनी विधानसभा अध्यक्षांकडे पक्षपात न करता न्याय देण्याची विनंती केलीय. विधानसभा अध्यक्ष हे कोणत्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. त्यामुळे विधासभा अध्यक्षांमोर सर्वांचा गुन्हा सारखाच आहे. राज्यपाल, मुख्यमंत्री आमदार प्रतोद यांच्या चुका सारख्याच आहेत. त्यामुळे अध्यक्षांनी पक्षपात न करता निर्णय द्यावा, असं परब म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.