संजय जाधव
Pune Crime News : पुण्यातून (Pune) एक संतापजनक बातमी समोर आली आहे. ब्रेकअप झाल्यानंतर प्रियकराने प्रेयसीचे नग्न फोटो व्हॉट्सअॅप (Whatsapp) स्टेटस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात हा प्रकार घडला आहे. देवेंद्र फुलफगर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हा प्रकार १ डिसेंबर रोजी घडला असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांच्यात तीन गेल्या वर्षापासून प्रेम संबंध होते. काही दिवसांपूर्वी दोघाचं ब्रेकअप झालं. त्यानंतर देवेंद्रने त्याच्या प्रेयसीला त्रास द्यायला सुरुवात केली. प्रियकर तिचा मानसिक छळ करत होता. त्यामुळे तिने या त्रासाला कंटाळून पोलिसांत धाव घेतली. तरुणीने आरोपी विरोधात मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव
हा गुन्हा मागे घ्यावा यासाठी आरोपीने एक डिसेंबर रोजी स्वतःच्या व्हॉट्सअॅप स्टेटस वर फिर्यादी यांचा नग्न अवस्थेतील फोटो ठेवला. त्यानंतर ‘ये तो शुरुआत है’ असे म्हणत फिर्यादीवर दबाव टाकला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.