Pune Gram Panchayat Election : पुणे जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर; 'या' तारखेला होणार मतदान

पुणे जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली आहे.
Voting
VotingSaamTV
Published On

सचिन जाधव

Pune News - पुणे (Pune) जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. जिल्ह्यातील १२ तालुक्यांमधील २२१ ग्रामपंचायतींच्या ७३१ सदस्य पदांसाठी आणि सरपंचपदासाठी ही निवडणूक होणार आहे. त्यानुसार निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून १८ डिसेंबरला मतदान होणार आहे. तर २० डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे.

Voting
Gujarat Election Results 2022 : "गुजरात तर मोदींचेच होते, पण दिल्ली जिंकणे ही खरी कसोटी होती"

निवडणूक कार्यक्रमानुसार ७३१ सदस्यपदासाठी ५०३५ उमेदवारांनी ५०७८ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यानंतर प्राप्त अर्जांची छाननी केल्यानंतर ३३ उमेदवारांचे ४८ अर्ज बाद झाले आहेत. त्यामुळे ५००४ वैध उमेदवारांचे ५०३० उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. १९७१ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले त्यामुळे ३०३३ उमेदवार रिंगणात आहेत.

सरपंचपदासाठी १०३५ उमेदवारांनी १०४० उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यानंतर प्राप्त अर्जांची छाननी केल्यानंतर १२ उमेदवारांचे अर्ज बाद झाले. तर ४६३ उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे आता सरपंचपदासाठी ५६० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

Voting
Gujarat Election Results 2022 : "गुजरात तर मोदींचेच होते, पण दिल्ली जिंकणे ही खरी कसोटी होती"

विविध जिल्ह्यातील तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या

पुणे - वेल्हे २८, भोरमधील ५४, दौंड आठ, बारामती १३, इंदापूर २६, जुन्नर १७, आंबेगाव २१, खेड २३, शिरूर चार, मावळ नऊ, मुळशी ११ आणि हवेली ७.

बीड : अंबाजोगाई ८३, आष्टी १०९, बीड १३२, धारुर ३१, गेवराई ७६, केज ६६, माजलगाव ४४, परळी ८०, पाटोदा ३४, शिरुर कासार २४, वाडवणी २५

भंडारा : भंडारा ३९, लाखांदूर ५१, लाखाणी ५१, मोहाडी ५८, पाओनी ४६, साकोली ४१, तुमसर ७७,

बुलढाणा : बुलढाणा १२, चिखली २८, देऊळगाव राजा १९, जळगाव जामोद १९, खामगाव १६, लोणार ३९, मलकापूर ११, मेहेकर ५०, मोताळा ११, नांदुरा १३, संग्रामपूर २१, शेगाव १०, सिंदखेड राजा ३०

अहमदनगर : अकोले ११, जामखेड ३, कर्जत ८, कोपरगाव २६, नगर २७, नेवासा, १३, पारनेर १६, पाथर्डी ११, राहाता १२, संगमनेगर ३७, शेवगाव १२, श्रीरामपूर ६, राहुरी ११, श्रीगोंदा १०

अकोला : अकोला ५४, अकोट ३७, बाळापूर २६, बार्शी टाकळी ४७, मुर्तिझापूर ५१, पातूर २८, तेल्हारा २३

अमरावती: अचलपूर २३, अमरावती १२, अंजनगाव सुर्जी १३, भातकुली ११, चांदुर बाझार २७, चांदूर रेल्वे स्टेशन १७, चिखलदरा २६, दर्यापूर २५, धामणगाव रेल्वे स्टेशन ७, धारणी २३, मोर्शी २४, नांदगाव खा. १७, तिवसा १२, वरुड २३,

औरंगाबाद : गंगापूर ३५, खुलताबाद १०, पैठण २२, फुलंब्री १८, सिल्लोड १८, वैजापूर २५, औरंगाबाद २५, कन्नड ५१, सोयगाव ५,

चंद्रपूर : बल्लारपूर ५, भद्रावती ७,ब्रह्मपुरी १, चंद्रपूर ५, चिमूर ४, जिवती ३, कोरपणा १०, मुळ ७, नागभिड ५, पोंभुर्णा २, राजुरा ४, साओली ३, सिंदेवाही २, वरोरा १,

धुळे: धुळे ३३, शिरपूर १७, शिंदखेडा २३ ,साक्री ५५,

गडचिरोली : अहेरी ३, अरमोरी २, चामोर्शी ४ ,देसाईगंज १, धानोरा ४, एटापल्ली १, कोर्ची १, गडचिरोली २, कुरखेडा २, सिरोंचा ७

गोंदिया : आमगाव ३४, अर्जुनी मोरगाव ४०, देवरी २५, गोंदिया ७१, गोरेगाव ३०, सडक अर्जुनी ४३, सालेकसा ३१,

हिंगोली : औंढा नागनाथ ७, वसमत १३, हिंगोली १६, कळमनुरी १६, सेनगाव १०

जळगाव : अमळनेर २४, भडगाव ६, भुसावळ६, बोदवड ५, चाळीसगाव १६, चोपडा ५, धरणगाव ७, एरंडोल ६, जळगाव १२, जामनेर १२, मुक्ताईनगर २, पारोळा ९, रावेर २२, यावल ८

जालना : अंबड ४०, घनसावंगी ३४, जाफ्राबाद ५५, जालना २९, परतूर ४१, भोकरदन ३२, मंठा ३५

रायगड: महाड ७३,श्रीवर्धन १३, अलिबाग ६, उरण १८, कर्जत ७, खालापूर १४, तळा १, पनवेल १०, पेण २६, पोलादपूर १६, माणगाव १९, मुरुड ५, म्हसळा १३, रोहा ५, सुधागड १४

रत्नागिरी: चिपळूण ३२, दापोली ३०, गुहागर २१, लांजा १९, मंडणगड १४, रत्नागिरी २९, संगमेश्वर ३६, खेड १०, राजापूर ३१

सांगली : आटपाडी २६, जत ८१, कडेगाव ४३, कवठे महाकाळ २९, खानापूर ४५, मिरज ३८, पलूस १६, शिराळा ६०, तासगाव २६, वाळवा ८८

सातारा : जावली १५, कराड ४४, खंडाळा २, खटाव १५, कोरेगाव ५१, महाबळेश्वरर ६, माण ३०, पाटण ८६, फलटण २४, सातारा ३९, वाई ७

सिंधुदुर्ग: देवगड ३८, दोडामार्ग २८, कणकवली ५८, कुडाळ ५४, मालवण ५५, सावंतवाडी ५२, वैभववाडी १७, वेगुर्ला २३

सोलापूर : अक्कलकोट २०, बार्शी २२, करमाळा ३०, माढा ८, माळशिरस ३५, मंगळवेढा १८, मोहोळ १०, उत्तर सोलापूर १२, पंढरपूर ११,सांगोला ६, दक्षिण सोलापूर १७

नांदेड : अर्धापूर २, उमरी १, कंधार १६, किनवट ५३, देगलूर १, धर्माबाद ३, नांदेड ७, नायगाव ८, बिलोली ९, भोकर ३, माहूर २७, मुखेड १५, मुदखेड १, लोहारा २८, हदगाव ६, हिमायतनगर १

नाशिक : इगतपुरी २, कळवण १६, चांदवड ३५, त्र्यंबकेश्वर १, दिंडोरी ६, देवळा १३, नांदगाव १५, नाशिक १४, निफाड २०, पेठ १, बागलाण ४१, येवला ७, सिन्नर १२

कोल्हापूर: आजरा ३६, भुदरगड ४४, चांदगड ४०, गडहिंग्लज ३४, गगनबावडा २१, हातकणंगले ३९, कागल २६, करवीर ५३, पन्हाळा ५०, राधानगरी ६६, शाहुवाडी ४९, शिरोळ १७

लातूर: अहमदपूर ४२, औसा ६०, चाकुर ४६, जळकोट १३, लातूर ४४, निलंगा ६८, शिरुर अनंतपाळ ११, उदगीर २६, देवणी ८, रेनापूर ३३

ठाणे : भिवंडी १४, कल्याण ९, मुरबाड १४, शहापूर ५

वर्धा : आर्वी २६, आष्टी ६, देवळी १२, हिंगणघाट १२, कारंजा १७, समुद्रपूर ७, सेलू २३, वर्धा १०

वाशिम :कारंजा ५७,मालेगाव ४८, मंगरुळपिर ४४, मानोरा ४१, रिसोड ४५, वाशिम :५२

यवतमाळ : अर्णी ७, बाभुळगाव १, दारव्हा ८, दिग्रस ५, घाटंजी ६, मारेगाव९, नेर १, पुसद १२, राळेगाव , उमररखेड ४, वाणी १९, यवतमाळ १६, झारजिमणी ४

नागपूर: भिवपूर १०, कळमेश्वर २३, कम्पटे २७, काटोल २७, कुही ४, मोऊदा २४, नागपूर ग्रामीण १९, नरखेड २२, पारशिवणी २२, रामटेक ८, सावणेर ३६, उमरेड ७, हिंगणा ७, मौऊदा

नंदुरबार :अक्कलकुवा ३१, अक्राणी ४७, नंदुरबार १८, नवापूर १६, शहादा १०, तळोदा १

उस्मानाबाद : भूम २, कळंब ३०, लोहारा १३, उस्मानाबाद ४५, परांडा १, तुळजापूर ४८, उमरगा २३, वाशी ४

पालघर : पालघर ३२, तलासरी १, वसई १५, वाडा १५,

परभणी : गंगाखेड १३, जिंतूर ३३, मानवत ८, पालम ११,परभणी २९, पाथरी ७, पूर्णा १३, सेलू ११, सोनपेठ ३

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com