Pune Crime News: धक्कादायक! रॅगिंगला कंटाळून २२ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या;' पुण्यातील खळबळजनक घटना

Pune News Update: याबाबत चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिस तपास करत आहेत.
Pune Crime News
Pune Crime NewsSaam TV

अक्षय बडवे, प्रतिनिधी...

Pune News: विद्येचे माहेर घर असलेल्या पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील एका नामांकित कॉलेजमध्ये शिकणाऱ्या २२ वर्षीय तरुणाने रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेनने परिसरात खळबळ उडाली असून पुण्यातील चतुश्रुंगी पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Pune News Update)

Pune Crime News
Kalyan Crime News: नोकरीला विरोध करुनही ऐकेना, पतीचा भररस्त्यात पत्नीवर चाकू हल्ला; प्रकृती गंभीर

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, राज रावसाहेब गर्जे (२२) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो पुण्यातील (Pune) नामांकित कॉलेजमध्ये तिसर्‍या वर्षात शिकत होता. राज याच्या मध्यस्थीने आरोपी निरूपम जयवंत जोशी याला काही पैसे उसने दिले होते. परंतु ते पैसे निरुपम जोशी परत देत नव्हता, त्यामुळे तो मानसिक तणावात आला होता. याच तणावातून राजने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे (Latest Marathi News)

Pune Crime News
Jalgaon News: पाण्याची मोटर चालू करायला गेली अन्‌..चिमुलीचा विजेच्‍या धक्‍क्‍याने मृत्‍यू

याबाबत राजचे वडील राजचे वडिल रावसाहेब प्रल्हाद गर्जे यांनी चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार निरूपम जयवंत जोशी याच्याविरूध्द आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत. (Crime News Update)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com