Shocking : धक्कादायक! नवीन मोबाइल फोन घेऊन दिला नाही, पुण्यात महिलेची आत्महत्या

Pune Pimpri Women Suicide News : पिंपरीत २५ वर्षीय विवाहित महिलेने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. नवीन फोन घेऊन न दिल्याच्या रागातून टोकाचं पाऊल उचललं. पोलिसांकडून तपास सुरू आहे.
Pune Pimpri Women Suicide News
Pune Pimpri Women Suicide NewsSaam Tv
Published On
Summary
  • पिंपरीत २५ वर्षीय महिलेची आत्महत्या

  • मोबाईल वादातून टोकाचं पाऊल

  • पोलिसांकडून तपास सुरू

  • परिसरात खळबळ

Pune Pimpari Vaishnavi Sucide News पुण्यात काही दिवसांपूर्वी एका विवाहित महिलेने सासू सासरे आणि नवऱ्याच्या छळाला एका विवाहित महिलेने आपलं आयुष्य संपवलं. ही घटना ताजी असतानाच पिंपरीत २५ वर्षीय महिलेने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे महिलेला नवीन मोबाईल न दिल्याच्या रागातून तिने टोकाचे पाऊल उचलले असल्याचं समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,मृत महिलेचं नाव वैष्णवी सावन दहिवाल (25) असे असून त्यांचं ३ वर्षांपूर्वी लग्न झालं. त्यांना एक दीड वर्षांची मुलगी आहे. त्या पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये कुटुंबासोबत राहत होत्या. त्यांचा जुना फोन खराब होऊन फुटला. त्यामुळे वैष्णवी यांनी कुटुंबीयांकडे नवीन फोन मागितला. मात्र त्यांना तो देण्यास कुटुंबीयांनी नकार दिला.

Pune Pimpri Women Suicide News
Rain Alert : ऐन सणासुदीच्या तोंडावर धो धो पाऊस कोसळणार; ११ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा

कुटुंबीय नवा मोबाइल देत नसल्याने त्या चिडचिड करायच्या. वैष्णवी यांनी रागारागातुन सोमवारी टोकाचं पाऊल उचलत राहत्या घरी आत्महत्या केली. वैष्णवी या बराच वेळ खोलीबाहेर न पडल्याने घरच्यांना काळजी वाटू लागली. त्यांनी खोलीकडे धाव घेतली असता आतमध्ये वैष्णवी यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला.

Pune Pimpri Women Suicide News
Manda Mhatre : आमदार मंदा म्हात्रे यांना हृदयविकाराचा झटका, नवी मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू

या प्रकरणी पोलिसांत माहिती देण्यात आली, पोलिसांनी तातडीने धाव घेत घटनास्थळ गाठले. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला असून याप्रकरणी चौकशी सुरु आहे. दरम्यान पुण्यातील तिसऱ्या वैष्णवीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com