वैकुंठ स्मशानभूमीवर पुणे शहराचा भार? 5 वर्षात 60 टक्के अंत्यसंस्कार

पुणे शहरातील (Pune City) वैकुंठ स्मशानभूमीवर संपूर्ण शहराचा भार पडत असल्याचं चित्र दिसून येत आहे.
वैकुंठ स्मशानभूमीवर पुणे शहराचा भार? 5 वर्षात 60 टक्के अंत्यसंस्कार
वैकुंठ स्मशानभूमीवर पुणे शहराचा भार? 5 वर्षात 60 टक्के अंत्यसंस्कार Saam TV
Published On

पुणे शहरातील (Pune City) वैकुंठ स्मशानभूमीवर संपूर्ण शहराचा भार पडत असल्याचं चित्र दिसून येत आहे. शहरातील २८ स्मशानभूमींपैकी (Vaikuntha Cemetery) एकट्या वैकुंठ स्मशानभूमीत ६० टक्के मृतदेहांवर अंत्यसंस्कार होत असल्याची माहिती उघड झाली आहे. सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी महिती अधिकारा अंतर्गत गेल्या 5 वर्षातील आकडेवारी समोर आणली आहे. पुणे शहराच्या १५ क्षेत्रीय कार्यालयात मिळून कोट्यावधी रुपये खर्च करून पुणे महापालिकेने २८ स्मशानभूमी उभारल्या आहेत.

वैकुंठ स्मशानभूमीवर पुणे शहराचा भार? 5 वर्षात 60 टक्के अंत्यसंस्कार
Breaking : ओला दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय लांबणीवर!

महापालिकेच्या विकास आराखड्यातील आरक्षणांचा मोबदला देऊन या स्मशानभूमींची उभारणी झाली आहे. यामागचा मूळ उद्देशच शहरातील विविध भागांतील नागरीकांना त्या त्या भागांत अंत्यसंस्कार करण्यासाठी सुविधा उपलब्ध व्हावी मात्र गेल्या 5 वर्षात एकट्या वैकुंठ स्मशानभूमीत 60 टक्के अंत्यसंस्कार झालेत म्हणजेच उर्वरित २७ स्मशानभूमींचा वापर अत्यल्प होतो हे उघड आहे. वैकुंठ स्मशानभूमी परिसरात वायू प्रदूषण आणि दुर्गंधी बद्दल नागरिकांनी या प्रकरणी थेट कोर्टात धाव घेतली आहे, त्यामुळे आतातरी प्रशासनाकडून धोरणात्मक निर्णय घेतला जावा अशी मागणी सजग नागरिक मंचकडून पालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com