Pune Chandani Chowk Flyover : पुण्यातील चांदणी चौक पुलाला वीर सावरकरांचे नाव द्या; हिंदू महासंघाची मागणी

Pune Chandani Chowk Flyover : पुण्यातील चांदणी चौकातील पुलाला वीर सावरकरांचे नाव देण्याची मागणी होत आहे.
Pune Chandani Chowk Flyover In Marathi
Pune Chandani Chowk Flyover In MarathiSaam tv
Published On: 

अक्षय बडवे, पुणे

Pune Chandani Chowk Flyover Should Naming Veer Savarkar : पुण्यातील चांदणी चौकातील नव्याने बांधलेल्या पुलाचे आज, शनिवारी लोकार्पण झाले. या पुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्यावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली असतानाच, आता हिंदू महासंघानं नवीन मागणी केली आहे. या पुलाला वीर सावरकर यांचे नाव दिले जावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पुण्यातील चांदणी चौकात (Pune Chandani Chowk) उभारलेल्या पुलाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत झाले. चांदणी चौकातील पुल बांधल्यानंतर नामकरणावरून अहमहमिका सुरू झाली आहे. (Latest Marathi News)

Pune Chandani Chowk Flyover In Marathi
Pune Traffic Jam and Pollution: पुण्यात चांदणी चौकाचं उद्घाटन, पण चर्चा मात्र वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाचीच; कोण काय म्हणालं ?

चांदणी चौकातील पुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली होती. आता वीर सावरकर यांचे नाव या पुलाला द्यावे, अशी मागणी हिंदू महासंघाने केली आहे.

वीर सावरकर यांच्या नावाने नऊ वर्षांत देशात काहीच उभे राहिलेले नाही, असे हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांचे म्हणणे आहे.

वीर सावरकर यांचे पुण्याशी असलेले नाते, त्यांचे वैज्ञानिक विचार पाहता त्यांचे नाव पुलाला देणे सर्वार्थाने योग्य ठरेल, अशी मागणी हिंदू महासंघाने केली आहे.

Pune Chandani Chowk Flyover In Marathi
Ajit Pawar On Pune Chandani Chowk Bridge: पुण्यातील चांदणी चौक नाव कसं पडलं?; अजित पवारांनी सांगितला इतिहास

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्यावे, संभाजी ब्रिगेडने सांगितले कारण

पुण्यातील रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या चांदणी चौकातील पुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्या, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. ही मागणी करण्यामागील कारणही संघटनेने सांगितले. पुण्याची ओळख छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आहे. १२ मावळातील सर्व मावळे सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली, असे संभाजी ब्रिगेडने म्हटले आहे.

मावळ्यांच्या कर्तृत्वाचा इतिहास पुण्यासह महाराष्ट्राने, देशाने पाहिला आहे. अशा कर्तृत्ववान राजाचा, छत्रपतींचा इतिहास हीच पुण्याची ओळख आहे. म्हणून चांदणी चौकाला अर्थात चांदणी चौकातील पुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव द्यावे, असे संभाजी ब्रिगेडचे म्हणणे आहे.

चांदणी चौक नाव कसे पडले?

चांदणी चौक हे नाव कसे पडले, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार यांनी चांदणी चौकातील पुलाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमात त्यामागचा इतिहास सांगितला. चांदणी चौकाचं नाव महापालिकेच्या नोंदणीत एनडीए चौक असे आहे. मात्र नागरिक सुरुवातीपासूनच या चौकाला चांदणी चौक म्हणून ओळखत आहेत. आधीच्या जुन्या पुलावर एका दगडावर चांदणी कोरली गेली होती. त्यामुळे या पुलाला चांदणी चौक नाव पडलं, असे काही जुनी मंडळी सांगते, असे अजित पवारांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.