Pune News: पुण्यातील वाहतूक कोंडी ही सर्वसामान्य नागरिकांसाठी एक सवयीचा भाग बनली आहे. आज पुण्यातील चांदणी चौकाच्या पुलाचा लोकार्पण सोहळा पार पडला. एकिकडे अनेक दिवसांपासून रखडलेला पुल तयार झालेला असताना दूसरीकडे अजूनही पुण्यातील गर्दी, वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाची चर्चा होताना पाहायला मिळाली. (Latest Marathi News)
पुण्यात सर्वच जण खासगी वाहनाने प्रवास करतात. त्यामुळे येथील वाहतूक कोंडी आणि प्रदूषण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. अशात चांदणी चौकाच्या रखडलेल्या कामामुळे पुणेकरांना मोठा त्रास सहन करावा लागला. आजच्या उद्घाटन सोहळ्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. या सर्वांनीच आपल्या भाषणात पुण्यातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाचा उल्लेख केला.
चांदणी चौक आणि वाहतूक कोंडीचं समिकरण
पुण्यातील वाहतूक कोंडीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील भाष्य केलं. "पुण्यातील उपनगरं जसजशी वाढत गेली तसतशी पुण्यातील गर्दी वाढली आहे. त्यामध्ये चांदणी चौक फार महत्वाचा ठरला. या चौकातूनच काही शहरांना जोडणारा हा रस्ता आहे. त्यामुळे चांदणी चौक आणि वाहतूक कोंडी यांचं एक वेगळंच समिकरण बनलंय."
फक्त डबलडेकर प्लाय ओव्हर नाही
"पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी फक्त डबलडेकर प्लाय ओव्हर नाही, तर एलिव्हेटेड रस्ते तयार करून त्या रस्त्याच्या माध्यमातून पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवायची अशा प्रकारचा अतिशय महत्वाचा प्लान नितीन गडकरी यांनी तयार केला आहे. राज्य सरकारच्या वतीने आम्ही देखील त्यांना आश्वासन देतो, की हा प्लान आणण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे सहकार्य करेल. जेणेकरून येत्या काळामध्ये वाहतुकीची कोंडी नसलेलं शहर म्हणून पुणे शहराची ओळख निर्माण करता येईल.",असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.
पुण्यातील वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी देखील चांदणी चौक पुलाच्या उद्घाटन सोहळ्यावेळी पुण्यातील वाहतुककोंडीवर भाष्य केलं. "लोकसंख्या वाढल्याने वाहनांची संख्या देखील प्रचंड वाढत आहे. त्यामुळेच वाहतुककोंडी होतेय. सध्या तंत्रज्ञान बदलेलं आहे. खाली रस्ता वरती पुल त्याच्यावरतीही पुल आणि त्यावर एक मास रॅपीड ट्रांस्पोर्ट अशी सिस्टीम लवकरच करता येणार आहे.", असं गडकरींनी म्हटलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.