लग्नाला नकार दिल्याने राग डोक्यात गेला, तरुणाकडून घरात घुसून गर्लफ्रेंडवर सपासप वार; तरुणीची मृत्यूशी झुंज सुरू

Pune woman stabbed after refusing marriage proposal: पुण्यातील चंदननगर परिसरात लग्नास नकार दिल्याने २२ वर्षीय तरुणीवर प्रियकराकडून चाकू हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत तरुणी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
Police investigation underway after a young woman was brutally stabbed in Pune’s Chandan Nagar area following a marriage rejection dispute.
Police investigation underway after a young woman was brutally stabbed in Pune’s Chandan Nagar area following a marriage rejection dispute.saam tv
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुणे: लग्नास नकार दिल्याने प्रियकराने केलेल्या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेली २२ वर्षीय तरुणी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. पुण्यातील चंदननगरमध्ये मागील आठवड्यात ही घटना घडली होती. तिच्या घरात घुसून आरोपीने चाकूने वार केले होते. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पीडित तरुणी आणि तिचा कथित प्रियकर हे दोघेही पुण्यातील एका नामांकित मॉलमध्ये काम करत होते.

Police investigation underway after a young woman was brutally stabbed in Pune’s Chandan Nagar area following a marriage rejection dispute.
Mumbai Crime: पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, भररस्त्यात चाकूने वार करत तरुणाला संपवलं; मुंबई हादरली

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दिलीप राठोड आणि पीडित तरुणी पुण्यातील एका नामांकित मॉलमध्ये एकत्र काम करत होते. कामाच्या ठिकाणीच दोघांची ओळख झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र, काही दिवसांपूर्वी तरुणीच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसऱ्या एका तरुणाशी निश्चित केले होते. ही माहिती तरुणीने आरोपीला दिली आणि "माझ्या घरच्यांनी लग्न ठरवले असल्याने आपण आता पुढे नको जायला, असे स्पष्ट केले.

Police investigation underway after a young woman was brutally stabbed in Pune’s Chandan Nagar area following a marriage rejection dispute.
Pune : पुण्यात चाललंय काय? आईस्क्रीम विक्रेत्याकडून १४ वर्षीय गतिमंद मुलीचा विनयभंग; नागरिकांमध्ये संताप

घरात घुसून केला हल्ला

आपल्या प्रेयसीचे लग्न दुसऱ्याशी ठरल्याचा राग आरोपी दिलीप राठोडच्या मनात होता. याच रागातून २९ एप्रिल रोजी रात्री ८:३० च्या सुमारास त्याने तरुणीच्या घरात प्रवेश केला. तिथे त्याने तरुणीशी वाद घालून तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापलेल्या आरोपीने आपल्या जवळील चाकूने तरुणीच्या गळ्यावर सपासप वार केले.

Police investigation underway after a young woman was brutally stabbed in Pune’s Chandan Nagar area following a marriage rejection dispute.
Mumbai - Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ट्रॅफिक जाम; वाहनांच्या लांबच लांब रांगा, प्रवाशांचा खोळंबा

आरोपी अटकेत, तरुणीची प्रकृती गंभीर

या हल्ल्यानंतर तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आठवडा उलटूनही तिची प्रकृती अद्याप गंभीर असून डॉक्टर तिचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. चंदननगर पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत तातडीने कारवाई करत आरोपी दिलीप राठोडला बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com