Pune Fire News: पुण्यात गोडाऊनला भीषण आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Pune GoDown Fire News: आग इतकी भीषण आहे की, धुराचे लोट हवेत दुरवर पसरलेत.
Pune Fire News
Pune Fire NewsSaam TV
Published On

अक्षय बादवे

Pune News: पुण्यातून आगीची एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. पुण्यातील येवलेवाडी येथे गोडाऊमध्ये भीषण आग लागली आहे. आग इतकी भीषण आहे की, धुराचे लोट हवेत दुरवर पसरलेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे (Pune) पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून एकुण १२ अग्निशमन वाहने घटनास्थळी रवाना झाली आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आग विझवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.

Pune Fire News
Indian Consulate Set Fire In San Francisco: सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भारतीय दूतावासावर हल्ला; खलिस्तान समर्थकांनी केली जाळपोळ

कापड आणि पडद्याच्या गोदामाला ही भीषण आग लागली आहे. ८ फायर इंजिन आणि ७ वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झालेत.

दिल्लीमध्ये गॅलक्सी मॉलला भीषण आग

काल राजधानी दिल्लीला लागून असलेल्या ग्रेटर नोएडामध्ये एका मॉलला भीषण आग (Delhi Mall Fire) लागल्याची घटना समोर आली होती. ग्रेटर नोएडा पश्चिम येथील गॅलेक्सी प्लाझामध्ये (Galaxy Plaza) ही भीषण आग लागली होती. यावेळी जीव वाचवण्यासाठी काही लोकांनी मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली उड्या मारल्या. सदर घटनेचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

Pune Fire News
Pune Fire News: आईमाता मंदिराजवळ अग्नितांडव; ३ एकर परिसरात पसरली आग

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com