Pune : मध्यरात्री बुधवार पेठेत पोलिसांचा छापा, 5 बांगलादेशी महिलांना अटक

Pune Budhwar Peth News : पुण्यातील बुधवार पेठ रेड लाईट परिसरात फरासखाना पोलिसांनी मोठी कारवाई. अवैधरित्या भारतात राहत असलेल्या ५ बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले.
PUNE POLICE DETAIN 5 BANGLADESHI WOMEN IN BUDHWAR PETH RAID
PUNE POLICE DETAIN 5 BANGLADESHI WOMEN IN BUDHWAR PETH RAIDSaam Tv
Published On
Summary
  • बुधवार पेठ परिसरात फरासखाना पोलिसांची मोठी कारवाई

  • अवैधरित्या भारतात राहत असलेल्या ५ बांगलादेशी महिला ताब्यात

  • रात्री १ ते सकाळी ९ वाजेपर्यंत विशेष कोंबींग ऑपरेशन

  • महिलांविरोधात परदेशी नागरिक कायद्यानुसार कारवाई सुरू

  • गेल्या ११ महिन्यांत पुण्यात ९४ बांगलादेशी नागरिक पकडले

सागर आव्हाड, पुणे

पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. बुधवार पेठ रेड लाईट परिसरात फरासखाना पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैधरित्या भारतात वास्तव्यास असलेल्या पाच बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पुणे पोलिसांच्या अवैध बांगलादेशी नागरिकांविरोधातील मोहिमेला आणखी वेग मिळाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, गेल्या ११ महिन्यांत पुणे शहर पोलिसांनी पकडलेल्या बांगलादेशी नागरिकांची संख्या आता ९४ वर पोहोचली आहे.

पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार, शहरात अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच मोहिमेअंतर्गत फरासखाना पोलीस स्टेशनचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार पेठ परिसरात विशेष कोंबींग ऑपरेशन करण्यात आले. हे ऑपरेशन रात्री १ वाजल्यापासून सकाळी ९ वाजेपर्यंत सुरू होते.

PUNE POLICE DETAIN 5 BANGLADESHI WOMEN IN BUDHWAR PETH RAID
Shocking : कोचिंग क्लासमधील शिक्षकाचं भयंकर कांड, हॉटेलमध्ये विद्यार्थिनीवर केला बलात्कार; आता २० वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

कारवाईदरम्यान पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे यांना गुप्त माहिती मिळाली की, बुधवार पेठेतील माचिस बिल्डिंग परिसरात काही बांगलादेशी महिला अवैधरित्या राहत आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ छापा टाकला. यावेळी पाच महिलांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्या बांगलादेशातून अवैध मार्गाने भारतात आल्याचे समोर आले.

PUNE POLICE DETAIN 5 BANGLADESHI WOMEN IN BUDHWAR PETH RAID
Kitchen Hack : उन्हाळ्यात मडक्यातलं पाणी पिताय? थांबा! त्यापूर्वी 'हे' आधी करा

प्राथमिक तपासात या महिला बुधवार पेठ परिसरात वेश्याव्यवसाय करून उदरनिर्वाह करत असल्याची माहिती उघड झाली आहे. तसेच त्यांच्याकडे बांगलादेशी नागरिकत्वाचे काही पुरावेही आढळून आले आहेत. पोलिसांनी संबंधित महिलांविरोधात परदेशी नागरिक कायद्यानुसार पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.

PUNE POLICE DETAIN 5 BANGLADESHI WOMEN IN BUDHWAR PETH RAID
Maharashtra Farmer Loan : कर्जमाफीचा मोठा निर्णय! ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार; सहकार विभागाची सरकारला माहिती

दरम्यान, शहरात अवैधरीत्या वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या कारवाईत पोलीस कर्मचारी सुनील मोरे, महेश राठोड, वशिम शेख, वैभव कदम, रविंद्र बत्तीशे तसेच महिला पोलीस कर्मचारी राणी शिंदे, पुनम ओव्हाळ, अर्चना ढवळे आणि करिष्मा कडाळे यांनी सक्रिय सहभाग घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com