Lalit Patil Case: ललित पाटील प्रकरणात मोठी अपडेट! पुणे पोलीस दलातील २ कर्मचारी बडतर्फ; कारण काय?

Lalit Patil Case Latest Update: ललित पाटील प्रकरणात मोठी अपडेट समोर आली असून पुणे पोलीस दलातील २ कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतून काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Lalit Patil Case: ललित पाटील प्रकरणात मोठी अपडेट! पुणे पोलीस दलातील २ कर्मचारी बडतर्फ; कारण काय?
Lalit Patil Case Two Police Dismissed Saam TV
Published On

पुणे, ता. ४ जुलै २०२४

ड्रग्स माफिया ललित पाटील पुण्यातील ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी आता सर्वात मोठी अपडेट समोर आली असून पुणे पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतून काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Lalit Patil Case: ललित पाटील प्रकरणात मोठी अपडेट! पुणे पोलीस दलातील २ कर्मचारी बडतर्फ; कारण काय?
Pune: काँग्रेस भवनाला छावणीचं स्वरुप; अरविंद शिंदेंच्या 'त्या' वक्तव्याविरोधात भाजपचे आंदोलन!

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील ससून रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. ड्रग्स माफिया ललित पाटीलने पलायन केल्यानंतर ससून रुग्णालय सर्वात चर्चेत आले होते. या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली होती. आता ललित पाटील प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली असून पुणे पोलीस दलातील २ कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतून काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पोलीस हवालदार आदेश शिवणकर आणि पिराप्पा बनसोडे अशी या दोघांची नावे आहेत. ड्रग्स माफिया ललित पाटील याला ससून रुग्णालयात एक्सरेसाठी घेऊन जाण्याची जबाबदारी या २ कर्मचाऱ्यांवर होती. परंतु हे दोघे ललीत पाटीलसोबत एक्सरेसाठी गेलेच नसल्याचे चौकशीत समोर आले आहे.

Lalit Patil Case: ललित पाटील प्रकरणात मोठी अपडेट! पुणे पोलीस दलातील २ कर्मचारी बडतर्फ; कारण काय?
Maharashtra Politics : मतांच्या राजकारणासाठी भाजपची 'नवाबी' भूमिका?; गंभीर आरोप केलेले भाजप, मलिकांच महायुतीत स्वागत करणार का?

दरम्यान, नियंत्रण कक्षास माहिती दिली असती तर पळून गेलेल्या ललित पाटीलला पकडता आले असते, परंतु या दोघांनी वरिष्ठ अधिकारी तसेच नियंत्रण कळवले नसल्याचे चौकशीमध्ये निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पुणे पोलीस मुख्यालयातील हे दोघे ही कर्मचारी आता सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहेत.

Lalit Patil Case: ललित पाटील प्रकरणात मोठी अपडेट! पुणे पोलीस दलातील २ कर्मचारी बडतर्फ; कारण काय?
Rahul Gandhi : विधानसभेच्या तयारीसाठी राहुल गांधी बनणार वारकरी; महायुतीत अस्वस्थता

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com