Maharashtra Politics : मतांच्या राजकारणासाठी भाजपची 'नवाबी' भूमिका?; गंभीर आरोप केलेले भाजप, मलिकांच महायुतीत स्वागत करणार का?

Maharashtra Politics 2024 : मंगळलारी रात्री अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादीचे तटस्थ राहिलेले आमदार नवाब मलिक देखील हजर होते.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSaam Digital
Published On

सुरज मसुरकर, साम टीव्ही प्रतिनिधी

काल रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी, या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादीच्या सर्व आमदार आणि नेत्यांची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलावली होती. या बैठकीनंतर सगळ्यात मोठा जो चर्चेचा विषय ठरला, तो म्हणजे भाजपने केलेल्या गंभीर आरोपांमुळे, ज्यांना जेलवारी करावी लागली होती ते म्हणजे नवाब मलिकांची बैठकीला हजेरी.

काल रात्री शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली आणि बाहेर आले ते बैठकीतले व्हिडिओन आणि त्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे तटस्थ राहिलेले आमदार नवाब मलिक देखील हजर होते. राष्ट्रवादी फुटीनंतर नवाब मलिक यांचा पाठिंबा नेमका कोणाला असे प्रश्न उपस्थित झाले होते मात्र काल मलिकांनी अजित पवार गटाच्या बैठकीला हजेरी लावली आणि त्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. मात्र असं जरी असलं तरी मालिकांची अजित पवार गटाच्या बैठकीला हजेरी ही घटना नवा वाद निर्माण करेल की मग विधान परिषद निवडणुकीसाठी मतांची जुळवाजुळव करण्यासाठी, मलिकांच एक मत हे महायुतीला महत्तवाचे ठरु शकेल.

या आधी भाजपने राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांच्यावरती गंभीर आरोप केले होते आणि त्याच आरोपानंतर नवाब मध्ये यांना जेलवारी देखील करावे लागली होती. आणि त्यानंतरच राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आणि अजित पवार गटाने सरकारला पाठिंबा दिला आणि त्यानंतर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात नवाब मलिकांनी हजेरी लावली आणि मुख्य म्हणजे मलिक सत्ताधारी बाकावर्ती बसले. आणि त्यानंतर पुन्हा एकदा राजकीय गोटात चर्चा सुरू झाली. ती म्हणजे नवाब मलिकांचा महायुतीला पाठिंबा का याची. मात्र लगेचच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहीत भाजपची भूमिका स्पष्ट केली. नवाब मलिक हे विधानसभेचे सदस्य आहेत, आमचे त्यांच्यासोबत कोणतेही वैयक्तिक वाद नाहीत मात्र ज्या पद्धतीचे आरोप नवाब मलिकांवरती आहेत ते पाहता त्यांना महायुतीमध्ये घेणं योग्य नाही असं पत्र देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना लिहित आपली व पक्षाची भूमिका मांडली होती.

Maharashtra Politics
Rahul Gandhi : विधानसभेच्या तयारीसाठी राहुल गांधी बनणार वारकरी; महायुतीत अस्वस्थता

मात्र आता जेव्हा विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुती मधील सर्वच पक्षांनी कंबर कसलीय आणि जोर धरला तो बैठकांचा. अशातच भाजपने आरोप केलेले, नवाब मलिक हे अजित पवार गटांच्या बैठकीला हजर राहतात आणि चर्चा सुरु होते ती भाजपने आपली घेतलेली भूमिका बदलली का याची. कारण एकीकडे विधान परिषद निवडणुकीसाठी मतांची जुळवा जुळव, तर दुसरीकडे सविधान बदलणार या नरेटिव्ह मुळे अल्पसंख्याक मतदारांमध्ये महायुतीच्या व मुख्य म्हणजे भाजपच्या प्रतिमेला लागलेला धक्का. या सगळ्यांसाठी, आगामी विधानसभा निवडणुकीत अल्पसंख्यांकाची मते महायुतीकडे वळवण्यासाठी महायुतीचा हा डाव आहे का? अश्या चर्चा रंगल्या आहेत.

कारण मलिकांनी अजित पवार गटाच्या बैठकीला लावलेली हजेरी याबद्दल भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांना विचारले असता, जोपर्यंत अजित पवार यांच्यासोबत युती आहे, तोपर्यंत अजित पवारांच्या पक्षाचा निर्णय आमच्या सोबत असेल अस ते मोठं वक्तव्य दरेकरांनी केलं, भाजपची भूमिका बदलली का या चर्चेला जोर आला. तर दुसरीकडे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विधानपरिषदेचे आमदार व प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी देखील तेवढचं महत्त्वाचं आणि मोठे विधान नवाब मलिकांना घेऊन केलं आहे. त्यांनी थेट नवाब मलिक हे महायुतीचे घटक आहेत असं म्हटले. नवाब मलिक हे आमच्या पक्षाचे आमदार आहेत, प्रवक्ते आहेत. तसेच

आरोप करण हे वेगळ आणि सिद्ध होणे वेगळे. त्यांना जनतेने निवडून दिले आहे. ते आमचे नेते आहेत आणि म्हणुन ते आमच्या बैठकीला आले, आणि म्हणजेच ते महायुतीत आहेत, अस अमोल मिटकरी म्हणाले. लत्यामुळे आता आरोप करणं वेगळं आणि ते सिद्ध होणं वेगळं याच आयुधाचा वापर करत, भाजप आता आपली घेतलेली भुमिका मतांसाठी बदलणार का? हे पाहणं महत्वाचे आहे.

Maharashtra Politics
Rahul Gandhi : विधानसभेच्या तयारीसाठी राहुल गांधी बनणार वारकरी; महायुतीत अस्वस्थता

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com