Pune News: पाणी आणायला विहिरीवर गेली, पाय घसरला अन् अनर्थ घडला; १५ वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू

Pune Latest News: इंदापूर तालुक्यातील राजवडी पाटी येथे पंधरा वर्षीय मुलीचा विहिरीत पाय घसरुन पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. सारिका पिराजी शिंदे असे या मुलीचे नाव असून पाणी आणायला विहिरीवर गेली असता ही दुर्दैवी घटना घडली.
Pune News:  पाणी आणायला विहिरीवर गेली, पाय घसरला अन् अनर्थ घडला; १५ वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू
Pune Latest News: Saamtv

पुणे, ता. २४ जून २०२४

पाणी आणण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय मुलीचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना इंदापूर तालुक्यात घडली. सारिका शिंदे असे या मृत मुलीचे नाव असून इंदापूर तालुक्यातील राजवडी पाटीवर घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Pune News:  पाणी आणायला विहिरीवर गेली, पाय घसरला अन् अनर्थ घडला; १५ वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू
Pune Drugs News : पुणे ड्रग्ज प्रकरणी काय काय कारवाई केली? पुणे पोलिसांनी दिली माहिती

याबाबात सविस्तर माहिती अशी की, इंदापूर तालुक्यातील राजवडी पाटी येथे पंधरा वर्षीय मुलीचा विहिरीत पाय घसरुन पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. सारिका पिराजी शिंदे असे या मुलीचे नाव असून पाणी आणायला विहिरीवर गेली असता ही दुर्दैवी घटना घडली.

याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तिचा शोध सुरू आहे. सारिका शिंदे ही जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यातील राहणारी आहे. आज सकाळी साडेसात वाजता राजवडी तालुक्यातील इंदापूर येथील एका विहिरीवर ती पाणी भरण्यासाठी गेली होती.

Pune News:  पाणी आणायला विहिरीवर गेली, पाय घसरला अन् अनर्थ घडला; १५ वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू
Pune News: 'पुण्यातील पब संस्कृती बंद करा', पतीत पावन संघटना आक्रमक; एल-थ्री बारची तोडफोड; पाहा VIDEO

याचवेळी ती पाय घसरून पाण्यात बुडाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. इंदापूर पोलीस आणि महसूल प्रशासनच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिकांच्या सहाय्याने तिचा शोध सुरू आहे. दरम्यान, या घटनेने मुलीच्या कुटुंबियांर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Pune News:  पाणी आणायला विहिरीवर गेली, पाय घसरला अन् अनर्थ घडला; १५ वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू
NCP Symbol Crisis: विधानसभेला चिन्हाचा घोळ नकोच! 'पिपाणी' विरोधात शरद पवार गटाची निवडणूक आयोगात धाव; पाहा VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com