महाराष्ट्र हादरला! साडेतीन वर्षांच्या मुलीच्या हत्येनंतर मुख्यमंत्री आक्रमक; पोलीस अधिक्षकांना दिले कडक आदेश

Pune Bhor Crime News Update : पुण्यातील भोर तालुक्यात एका साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर ६५ वर्षांच्या नराधमाने अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळली आहे.
CM Devendra Fadnavis
CM Devendra Fadnavis saam tv
Published On

Devendra Fadnavis on Pune Bhor Incident : पुण्यातील भोर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर ६५ वर्षांच्या नराधमाने बलात्कार करून तिची हत्या केली. ही घटना अत्यंत निंदनीय आणि क्लेशदायक असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या क्रूर कृत्यामुळे समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याचे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे जुने संदर्भही समोर येत आहेत. या घटनेमुळे पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे असेही ते म्हणाले.

आरोपीला पोलिसांनी अटक केलीच आहे, मात्र आता हे संपूर्ण प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी आम्ही न्यायालयाला विशेष विनंती करणार आहोत. या नराधमाला कमीत कमी वेळात मृत्यूदंडाची शिक्षा मिळावी, हीच आमची न्यायालयाकडे आग्रही मागणी असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वास व्यक्त केला. या प्रकरणी कठोर कारवाईचे आदेश पुणे ग्रामीण अधिक्षकांना दिल्याचेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

CM Devendra Fadnavis
HSC Result 2026 : महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल 'इतके' टक्के, यंदाही मुलींनीच मारली बाजी

या प्रकरानंतर विरोधकांकडून महाराष्ट्र आणि येथील महिला असुरक्षित असल्याचा आरोप केला जात आहे. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रत्येक घटनेत राजकारण शोधणे यापेक्षा दुर्दैवी काहीही असू शकत नाही. काही बाबतीत संवेदनशीलता बाळगणे आवश्यक असते. विरोधक त्यांचे काम करतील, परंतु राज्य सरकार जे करणे आवश्यक आहे ते सर्व ठोस पावले नक्कीच उचलेल.

CM Devendra Fadnavis
Mumbai Crime : आधी वीट मारली, मग गळा दाबला; वांद्र्यातील वृद्ध महिलेच्या हत्येचे अंगावर काटा आणणारे सत्य समोर

चिमुरडीच्या हत्येच्या निषेधार्थ आज नसरापूर कडकडीत बंद आहे. गावकऱ्यांनी 'मुका मोर्चा' काढला होता. प्रशासनाच्या आश्वासनानंतर गावकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. पण परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. गावकऱ्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री सुमित्रा पवार यांची भेट घेणार आहे. नसरापूर अत्याचार प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत पोलीस अधीक्षक संदीप गिल यांना कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर तपासाला वेग आला असून नराधमाला कठोर शिक्षा करण्याची गावकऱ्यांनी मागणी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com