

पुण्यात आणखी एका भोंदू बाबाचा घाणेरडा प्रकार
महिलेकडून विनयभंगाचा गंभीर आरोप
आश्रमातून शोषण केल्याचा आरोप
नाशिकमधील भोंदूबाबाब अशोक खरात यांच्या कारनाम्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. खरात बाबा सध्या अटकेत आहे, मात्र अजूनही समाजात भोंदूबाबा आहेत, जे चमत्कारीक गोष्टी करत महिलांना आपल्या जाळ्यात ओढत आहे. नाशिकनंतर वसईच्या बाबाचे कारनामे समोर आल्यानंतर आता पुण्यातील आणखी एका बाबाचा कारनामा समोर आला आहे.
पुण्यातील चांडोली येथील शिवदत्त आश्रमात ‘महाराज’ म्हणून वावरणाऱ्या बाबावर महिलांचे शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. खेड तालुक्यातील चांडोली येथील बाबाने अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे शोषण केले असा आरोप करण्यात येत आहे. येथील शिवदत्त आश्रमातील भोंदू बाबाविरोधात पीडित महिलेने राजगुरुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
दोष निवारण’च्या नावाखाली शारीरिक संबंधांची मागणी करत विनयभंग केल्याचे पीडितेचे म्हणणे आहे. सुरुवातीला भीतीपोटी तक्रार दडपली गेली, मात्र नंतर संपूर्ण प्रकार उघड करण्यात आला.दरम्यान, राजगुरुनगर पोलीसांत गुन्हा दाखल असूनही आरोपी अद्याप फरार असल्याने पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान महिलेच्या आरोपानंतर शिवदत्त आश्रममधील महाराजांनी माध्यमासमोर येऊन आपली बाजू मांडली आहे. मला बदनाम करण्यासाठी आरोप केले असं म्हणत त्यांनी महिलेचे आरोप फेटाळले आहेत.
वसई येथील स्वयंघोषित धार्मिक गुरू ऋषिकेश वैद्यने एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना काही दिवसापूर्वीच घडली होती. मी शंकर आहे आणि तू माझी पार्वती आहेस, असं बोलून महिलेला आपल्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केला होता. याप्रकरणी स्वयंघोषित बाबा ऋषिकेश वैद्य अटक झाली असून तो तुरुंगात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.