Pune and Pimpri-Chinchwad Auto Rickshaw Fares : पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये १ सप्टेंबरपासून रिक्षा प्रवास महागणार आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (RTO) या अधिकच्या भाडेवाढीला अधिकृत मान्यता दिली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये रिक्षाने प्रवास करणे महागणार आहे.
नव्याने जाहीर करण्यात आलेल्या दरवाढीनुसार प्रवाशांना आता पहिल्या दीड किलोमीटरच्या (१.५ किमी) टप्प्यासाठी २५ रुपयांऐवजी ३० रुपये मोजावे लागणार आहेत. म्हणजेच पहिल्या टप्प्यात थेट ५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यापुढील प्रति किलोमीटर प्रवासासाठी आधी १७ रुपये आकारले जात होते, तो दर आता २० रुपये प्रति किलोमीटर करण्यात आला आहे.
गेल्या काही काळापासून वाढलेली इंधनदराची महागाई आणि रिक्षाच्या देखभालीचा खर्च लक्षात घेता रिक्षा संघटनांकडून भाडेवाढीची मागणी केली जात होती. प्रशासनाच्या या निर्णयामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील हजारो रिक्षाचालकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. १ सप्टेंबरपासून या नवीन भाडेदरांची अमलबजावणी संपूर्ण शहरात केली जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.