Pune Acid Attack : पुण्यात थरकाप! लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या तरुणीवर भररस्त्यात भयानक कृत्य; पोलिसांनी कर्नाटकातून कशा आवळल्या मुसक्या?

Pune Crime News : पुण्यात लिव्ह-इन रिलेशनशिपच्या रागातून तरुणी आणि तिच्या मित्रावर अॅसिड हल्ला करणाऱ्या आरोपीला पुणे पोलिसांनी कर्नाटकातील हुबळी येथून अटक केली आहे. या धक्कादायक घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
Pune Crime News
Pune Crime NewsSaam
Published On

Live-In Relationship News : "तू माझी नाही झालीस, तर.." पुण्यात माथेफिरूने तरुणीवर आणि तिच्या मित्रावर अॅसिड हल्ला केला होता. या प्रकरणात पुणे पोलिसांनी आरोपीला कर्नाटकमधून बेड्या ठोकल्या आहेत. तरुणी मित्रासोबत 'लिव्ह-इन रिलेशनशिप'मध्ये राहत असल्याच्या रागातून हा अॅसिड हल्ला केल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलेले आहे.

"तू माझ्यासोबत का राहत नाहीस? तू माझी नाही झालीस, तर कोणाचीच होऊ देणार नाही," असे म्हणत एका माथेफिरूने तरुणीवर आणि तिच्या मित्रावर अॅसिड हल्ला केला. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. श्रीराम मधु सरुनवर (वय ३०) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. २१ वर्षीय पीडित तरुणीने याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

Pune Crime News
Expressways : महाराष्ट्राला मिळाले ४ नवीन द्रुतगती महामार्ग; ५१,९०६ कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी, २०२८ पर्यंत प्रवास होणार सुस्साट

हा सगळा प्रकार २० मे रोजी रात्री २ वाजण्याच्या सुमारास पुण्यातील ताडीवाला रोड येथे घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि तिचा मित्र हे दोघे पुण्याच्या एका हॉटेल मध्ये काम करतात. काम संपल्यानंतर बुधवारी पहाटे दोघेही ताडीवाला रोड येथील आपल्या राहत्या घराच्या दिशेने निघाले होते.

याच वेळी आरोपी सरुनवर दबा धरून बसला होता. पीडित तरुणी ही त्याचा रोष झुगारून मित्रासोबत लिव्ह-इनमध्ये राहते, याचा राग त्याच्या मनात होता. श्रीरामने तिचा रस्ता अडवला आणि "तु माझ्यासोबत का राहत नाहीस? तु माझी नाही तर कोणाचीच होऊ देणार नाही," अशी धमकी दिली.

Pune Crime News
Ladki Bahin Yojana : ई-केवायसी राहिलेल्या 'लाडक्या बहिणीं'साठी महत्त्वाची बातमी, सरकारनं स्पष्ट शब्दात सांगितले, वाचा

काही समजण्याच्या आतच, आरोपीने स्वतःसोबत आणलेल्या प्लास्टिक ड्रममधील 'अॅसिड'सारखा तीव्र ज्वलनशील रासायनिक पदार्थ तरुणीच्या अंगावर फेकला. हे केमिकल तरुणीच्या मानेवर, पाठीवर आणि दोन्ही पायांवर पडल्याने ती जागीच होरपळली. आरोपीने तिच्या मित्रांवर सुद्धा अॅसिड फेकले, ज्यामुळे त्याच्याही पायाला गंभीर दुखापत झाली.

दोघेही वेदनेने ओरडत असताना आरोपी घटनास्थळावरून अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. शहराच्या मध्यवस्तीत तरुणीवर अॅसिड हल्ला झाल्याचे समजताच पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केल्यानंतर पोलिसांनी थेट कर्नाटक गाठत हुबळी येथून आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

Pune Crime News
कॉकरोच जनता पार्टीचे X अकाऊंट अचानक बंद, नेमकं कारण काय? संस्थापक म्हणतोय, 'ज्याची भीती होती, तेच झालं'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com