Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार, भरधाव कारच्या धडकेत सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

Pune Car Accident: पुण्यात भीषण रस्ते अपघातामध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू झाला. पुण्यात बावधन-पाषाण रस्त्यावर ही घटना घडली. पोलिसांकडून तपास सुरू आहे.
Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार, भरधाव कारच्या धडकेत सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू
Pune Car AccidentSaam Tv
Published On
  • पुण्यात पाषाण-बावधन रस्त्यावर भीषण अपघात

  • नेकलेस गार्डनजवळ भरधाव कारने सॉफ्टवेअर इंजिनिअरला धडक दिली

  • या अपघातात विरेंद्र द्विवेदी यांचा मृत्यू झाला

  • अपघातानंतर गंभीर जखमी द्विवेदी यांना रुग्णालयात नेण्यात आले पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला

सागर आव्हाड, पुणे

पुण्यामध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू झाला. पाषाण-बावधन रस्त्यावर ही अपघाताची घटना घडली. भरधाव कारने इंजिनिअरला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये इंजिनिअरचा जागीच मृत्यू झाला. ही कार १९ वर्षीय तरुण चालवत होता. या अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी इंजिनिअरचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिस सध्या अपघाताचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पाषाण-बावधन रस्त्यावर नेकलेस गार्डनजवळ भीषण अपघात झाला. भरधाव कारने धडक दिल्याने सॉफ्टवेअर इंजिनिअर विरेंद्र द्विवेदी यांचा जागीच मृत्यू झाला. विरेंद्र द्विवेदी हे नियमितपणे व्यायाम करत असताना त्यांना भरधाव कारने धडक दिली. धडकेनंतर गंभीर जखमी झालेल्या द्विवेदी यांना उपचारासाठी त्याच कारमधून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार, भरधाव कारच्या धडकेत सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू
Accident: भाविकांवर काळाचा घाला, भरधाव ट्रकची कारला धडक; ६ मित्रांचा जागीच मृत्यू

या घटनेनंतर कारच्या मालकीबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित कार BLUERAYS Developers या कंपनीच्या नावावर असल्याचे समजते. कारचा पत्ता ABIL हाऊसचा असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, कार नेमकी कोणाच्या ताब्यात होती आणि अपघाताच्या वेळी ती कोण चालवत होते? याबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. प्रत्यक्षदर्शींनी ही कार १९ वर्षीय तरुण चालवत असल्याचे सांगितले. या प्रकरणी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार, भरधाव कारच्या धडकेत सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू
Accident : हायवेवर काळाचा भीषण घाला! नागपूरला जाणाऱ्या ट्रकचा भयानक अपघात; ८ जणांचा जागीच दुर्दैवी अंत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com