Pune Accident News: ती भेट अखेरची ठरली! मुलाला भेटून जाताना भरधाव वाहनाच्या धडकेत पित्याचा मृत्यू; सर्वत्र हळहळ

रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मुलाला भेटून जात असताना हा भीषण अपघात झाला...
Pune Accident News
Pune Accident NewsSaamtv

सचिन जाधव, प्रतिनिधी...

Pune Accident News: मुलाला भेटून घरी परत जात असताना भरधाव वाहनाने धडक दिल्यामुळे एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला.ही घटना १३ मे रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर घडली घडली आहे. या दुर्देवी घटनेने हळहळ व्यक्त केली जात असून बंडगार्डन पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Accident News
Amruta Fadnavis Blackmailing Case: अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणी नवी अपडेट; जयसिंघानीचा पाय आणखी खोलात

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनकवडी येथील सदाशिव वनशिव यांच्या मुलावर ससून रुग्णालयात (Sasun Hospital) वैद्यकीय उपचार सुरू आहेत. ते मुलाला भेटून परत धनकवडी येथील घरी निघाले होते. ते ससूनच्या प्रवेशद्वाराबाहेर आल्यानंतर भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्यामुळे सदाशिव वनशिव यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर वाहनचालक पसार झाला आहे. (Accident News)

Pune Accident News
Cordelia Cruz Drug Case: आर्यन खानचं नाव शेवटच्या वेळी आरोपींच्या यादीत टाकलं, चौकशी अधिकाऱ्याचा मोठा दावा

सदाशिव तुकाराम वनशिव (वय ७७ वर्ष, रा. धनकवडी, पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचा नातू शुभम वाघमारे (वय २८, रा. हिंजवडी, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून बंडगार्डन पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com