Amruta Fadnavis Blackmailing Case: अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणी नवी अपडेट; जयसिंघानीचा पाय आणखी खोलात

७३३ पानांच्या या आरोपपत्रात १३ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आली आहे.
Amruta Fadnavis Blackmail Case
Amruta Fadnavis Blackmail Casesaam tv

सचिन गाड

Amruta Fadnavis Blackmailing Case Update: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एका महिलेने धमकावून १ कोटी रुपयांची लाच ऑफर करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.

अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणी SIT ने आरोपपत्र दाखल केले आहेत. ७३३ पानांच्या या आरोपपत्रात १३ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आली आहे. आरोपींविरोधात आणखी काही पुरावे आढळल्यास पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात येईल, असे पोलिसांनी म्हटले आहे. (Latest Marathi News)

Amruta Fadnavis Blackmail Case
Akola News: दुर्दैवी! कर्जबाजारीला कंटाळून शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल

भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत स्थापन विशेष न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले. कुप्रसिध्द बुकी अनिल जयसिंघानी, त्याची मुलगी अनिक्षा आणि चुलत भाऊ निर्मल यांच्या विरोधात आरोपपत्र हे दाखल करण्यात आले आहे.

मलबार हिल पोलिसात तक्रार

अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी 20 फेब्रुवारी रोजी मलबार हिल पोलिसात तक्रार दाखल केली होती. तक्रारीत अनिल जयसिंघानी आणि अनिक्षाने त्यांना ब्लॅकमेल केले आणि धमकी देत त्यांच्या कडून 10 कोटी रुपये खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला,अस आरोप करण्यात आला होता

मलबार हिल पोलिसांनी (Police) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लाच देण्याच्या प्रयत्न आणि ब्लॅकमेल केल्याच्या आरोपाखाली अनिल जयसिंघानी 20 मार्च रोजी गुजरातमधून अटक केली होती. 4 दिवसानंतर मुलगी अनिक्षा जयसिंघानीला देखील या प्रकरणात अटक करण्यात आली होती. काही दिवसानंतर तिला जामीन मिळाल्यानंतर ती बाहेर आली होती.

Amruta Fadnavis Blackmail Case
Beed News: मोठी बातमी! बीड शिवसेना जिल्हाप्रमुखांची हकालपट्टी; सुषमा अंधारेंना मारहाण केल्याच्या दाव्यानंतर कारवाई

कोण आहे अनिक्षा जयसिंघानी?

अनिक्षा जयसिंघांनी सट्टेबाज अनिल जयसिंघानीची मुलगी आहे. अनिल जयसिंघानी विरोधात अनेक केसेस आहे. अनिक्षा जयसिंघानी हिने 2015-16 मध्ये अमृत फडवणवीस यांनी भेट घेतली होती. यानंतर मात्र 2021 पर्यंत अनिक्षा अमृता फडणवीस यांच्या संपर्कात नव्हती. काही वर्षांनी अनिक्षाने अमृत फडणवीस यांच्याकडे वडिलांना क्लिन चीट मिळावी यासाठी मदत मागितली.

अमृता फडणवीस यांच्या तक्रारीनुसार, अनिक्षाने त्यांना 1 कोटींच्या लाचेची ऑफर दिली होती. मात्र नकार दिल्यानंतर अनिक्षाने त्यांना काही ऑडिओ आणि व्हिडीओ सेंड करत ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. मात्र अमृता फडणवीस यांनी अनिक्षाचा नंबर ब्लॉक केला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com