Pune News: मोठी बातमी! पुण्यातील २२ नगरसेवकांविरोधात अपात्रतेची कारवाई, नेमकं कारण काय?

Pune Municipal Corporation: पुण्यातील २२ नगरसेवकांविरोधात अपात्रतेची कारवाई करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली. या सर्वांना पुढच्या ३ वर्षांसाठी अपात्र करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना निवडणूक लढता येणार नाही.
Pune News: मोठी बातमी! पुण्यातील २२ नगरसेवकांविरोधात अपात्रतेची कारवाई, नेमकं कारण काय?
Pune Municipal CorporationSaam Tv
Published On
  • पुण्यातील नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई

  • निवडणूक खर्चाचा हिशोब न दिल्याने कारवाई

  • पुण्यातील २२ नगरसेवकांवर मोठी कारवाई

  • राज्य निवडणूक आयोगाने केली कारवाई

सागर आव्हाड, पुणे

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ४० उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये पुणे महानगर पालिकेच्या २२ नगरसेवकांचा समावेशा आहे. त्यामुळे या नगरसेवकांना मोठा धक्का बसला आहे. अपात्र ठरवण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये पुण्यासह पंढरपूर नगरपरिषद आणि अक्कलकोट नगरपरिषदेतील उमेदवारांचा देखील समावेश आहे. या सर्वांना पुढच्या ३ वर्षांसाठी अपात्र करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे विभागातील नगरपरिषद, नगरपंचायती आणि महानगरपालिका निवडणुकांमधील पुणे महानगरपालिकेच्या २२ नगरसेवकांना अपात्र ठरवण्यात आले आहे. तसंच, पंढरपूर नगरपरिषदेच्या १५ उमेदवारांना आणि अक्कलकोट नगरपरिषदेच्या ३ उमेदवारांना देखील अपात्र ठरवण्यात आले आहे. एकूण ४० उमेदवारांवर २६ मे २०२६ पासून पुढील ३ वर्षासाठी अपात्र करण्यात आले आहे. विभागीय आयुक्त शीतल तेली- उगले यांनी या उमेदवारांना अपात्र ठरवल्याची माहिती दिली.

शीतल तेली-उगले यांच्याकडून अपात्र घोषित करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांना आणि संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयांना पाठवण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, २ डिसेंबर २०२५ रोजी पुणे विभागातील एकूण ६० नगरपरिषदा, नगरपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक पार पडली होती. तर ६ महानगरपालिकांची सार्वत्रिक निवडणूक १४ जानेवारी २०२६ रोजी झाली होती.

Pune News: मोठी बातमी! पुण्यातील २२ नगरसेवकांविरोधात अपात्रतेची कारवाई, नेमकं कारण काय?
Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव कार पुलावरून खाली कोसळली, वाहनाचा चुराडा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये निवडणूक लढवलेल्या पुणे महानगर पालिकेच्या २२ नगरसेवकांनी, पंढरपूर नगरपरिषदेच्या १५ आणि अक्कलकोट नगरपरिषदेच्या ३ अशा एकूण ४० उमेदवारांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम १० (१ई) तसेच महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत आणि औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ कलम १६ (१ड) मधील तरतुदीनुसार विहित मुदतीत म्हणजे ३० दिवसात निवडणूक खर्चाचा हिशोब सादर केला नाही. त्यामुळे या सर्वांना अपात्र ठरवण्यात आले.

Pune News: मोठी बातमी! पुण्यातील २२ नगरसेवकांविरोधात अपात्रतेची कारवाई, नेमकं कारण काय?
Pune October Heat: पावसाची विश्रांती, उन्हाचा चटका वाढला; ऑक्टोबर हिटमुळे पुणेकर घामाघूम

पुणे महानगरपालिका आयुक्त आणि सोलापूर जिल्हाधिकारी यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार, विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे ५ आणि २५ मे २०२६ रोजी याबाबत संबंधिताना आपले म्हणणे दाखल करण्याबद्दल सुनावणी आयोजित करण्यात आली होती. पण या सुनावणीदरम्यान संबंधित उमेदवारांकडून समाधानकारक खुलासा प्राप्त झाला नाही. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार संबंधित उमेदवारांना निवडणूक खर्च सादर करण्यात कसूर केल्याबद्दल आदेशाच्या दिनांकापासून पुढील ३ वर्षाच्या कालावधीसाठी निवडणूक लढविण्यास अपात्र घोषित करण्यात आले, अशी माहिती नगर परिषद प्रशासनाच्या उप आयुक्त प्रतिभा पाटील यांनी दिली.

Pune News: मोठी बातमी! पुण्यातील २२ नगरसेवकांविरोधात अपात्रतेची कारवाई, नेमकं कारण काय?
Pune Porsche Accident: पोर्शे कार अपघात प्रकरण, जेलवारी करूनही अग्रवाल कुटुंबीयांचा माज उतरला नाही; धक्कादायक VIDEO चर्चेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com