Mumbai-Pune Highway : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खासगी बसने पती-पत्नीला चिरडलं; अपघाताचा थरारक VIDEO समोर

Mumbai-Pune Old Highway : जुन्या मुंबई पुणे महामार्गावर खासगी बसने पती-पत्नीला चिरडलं
Mumbai - Pune Old Highway Accident
Mumbai - Pune Old Highway Accident Saam TV
Published On

दिलीप कांबळे, साम टीव्ही मावळ

Mumbai - Pune Old Highway Accident

कामानिमित्त दुचाकीवरून बाहेरगावी निघालेल्या पती-पत्नीला खासगी बसने जोरदार धडक दिली. या धडकेत पत्नीचा जागीच मृत्यू, तर पती गंभीर जखमी झाला. ही दुर्देवी घटना जुना मुंबई पुणे महामार्गावर लोणावळ्यातील खंडाळा परिसरात मंगळवारी (ता. ३०) घडली. अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

Mumbai - Pune Old Highway Accident
Traffic Jam In Pune: सुट्ट्यांमुळे वर्दळ वाढली, वाहनांच्या संख्येत वाढ; पुणे मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी

सुरेखा सणस असं मृत महिलेचं नाव असून आनंद सणस, असं गंभीर जखमी झालेल्या पतीचं नाव आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत खासगी बसचालकाला ताब्यात घेतलं आहे. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.

जुना मुंबई-पुणे महामार्गावर अपघाताचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. दररोज महामार्गावर छोटे मोठे अपघात होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सणस दाम्पत्य कामानिमित्त नवी मुंबई येथून दुचाकीवरून पुण्याच्या दिशेने निघालं होतं.

मात्र, एका अवघड वळणावर पाठीमागून येणाऱ्या खासगी बसने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत सुरेखा सणस या बसच्या चाकाखाली आल्या. अंगावर चाक गेल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. जखमी अवस्थेत असलेल्या आनंद यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तसेच मृत सुरेखा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. याप्रकरणी बस चालकाला ताब्यात घेण्यात आलं.

Mumbai - Pune Old Highway Accident
Mumbai Local Speed : हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठी मोठी बातमी! लोकल प्रवास अधिक वेगवान होणार, मध्य रेल्वेचा महत्वाचा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com