Mumbai Local Speed : हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठी मोठी बातमी! लोकल प्रवास अधिक वेगवान होणार, मध्य रेल्वेचा महत्वाचा निर्णय

Mumbai harbour line speed : मध्य रेल्वेने हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल वेग वेगवान होणार आहे. मध्य रेल्वेच्या निर्णयामुळे हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकलचा वेग वाढणार आहे.
Mumbai Local Speed : हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठी मोठी बातमी! लोकल प्रवास आणखी वेगवान होणार, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय
Mumbai Local Speed Saam Digital

आवेश तांदळे, मुंबई

मुंबई : हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी हाती आली आहे. मध्य रेल्वेने हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल वेग वेगवान होणार आहे. मध्य रेल्वेच्या निर्णयामुळे हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकलचा वेग वाढणार आहे. या निर्णयामुळे या मार्गावरील प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे.

मध्य रेल्वेच्या निर्णयामुळे हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल वेगमर्यादा ताशी 80 किमीवरून ताशी 100 किमी लवरकच करण्यात येणार आहे. तसेच पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचण्यास दीड तास लागत होता. यामुळे प्रवाशांच्या १० ते १२ मिनिटांची बचत होणार आहे.

Mumbai Local Speed : हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठी मोठी बातमी! लोकल प्रवास आणखी वेगवान होणार, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय
Explainer : लोकल गर्दीमुळे आणखी किती रियांचे बळी जाणार? डोंबिवली - कोपरदरम्यानच घटना का घडताहेत?

रेल्वे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला म्हणाले की, 'एसी लोकलमध्ये प्रवाशांची संख्या वाढली आहे. मार्चपर्यंत डेटा आपल्याकडे आला आहे. त्यामध्ये पाच ते सहा टक्क्यापर्यंत प्रवासी वाढले आहेत. उष्णतेच्या लाटेदरम्यान लोकांना आवाहन करत आहे की, मागची लाट शनिवारी आणि रविवारी होती. गरज असेल तर प्रवास करा. स्टेशनवर थंड पाण्याची सोय केली आहे'.

Mumbai Local Speed : हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठी मोठी बातमी! लोकल प्रवास आणखी वेगवान होणार, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय
Thane News: लोकल ट्रेनचा प्रवासचा ठरला अखेरचा; आयआयटी विद्यार्थ्याचा रेल्वेतून पडून मृत्यू

'हार्बर मार्गावरील लोकल ट्रेनचा वेग वाढवणार आहे. या मार्गावरील लोकलचा 100 किमी करणार आहे. या वेगाची अंमलबजावणी एक ते दीड महिन्यात होणार आहे. मध्य रेल्वेकडून सर्व प्रयत्न सुरु आहेत, असे ते मध्य रेल्वेच्या निर्णयाबाबत पुढे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com