Thane News: लोकल ट्रेनचा प्रवासचा ठरला अखेरचा; आयआयटी विद्यार्थ्याचा रेल्वेतून पडून मृत्यू

IIT Student Dies After Falling From Train: मुंबईसह उपनगरात कामानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे लोकलमध्ये प्रचंड गर्दी असते. त्यामुळे काही जणांचा गर्दीने भरलेल्या ट्रेनमधून पडून प्रवाशांच्या मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहे.
Mumbai Local Train
Mumbai Local TrainSaam Digital

मुंबईसह उपनगरात कामानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे लोकलमध्ये प्रचंड गर्दी असते. त्यामुळे काही जणांचा गर्दीने भरलेल्या ट्रेनमधून पडून प्रवाशांच्या मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहे. या अपघातांची संख्या मुंब्रा -कळवा दरम्यान वाढल्या आहेत. अशातच पुन्हा एकदा एका २५ वर्षीय आयआयटी विद्यार्थ्यांचा ट्रेनमधून पडून मृत्यू झाला आहे.

Mumbai Local Train
Thane Crime News : लाच स्वीकारताना दोन पोलीस रंगेहाथ अडकले जाळ्यात; ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

हिंदूस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, गुरुवार २५ एप्रिल रोजी सकाळी आयआयटी विद्यार्थ्याचा ट्रेनमधून पडून मृत्यू झाला आहे. अवधेश राजेश दुबे असे मृत तरुणाचे नाव असून तो डोंबिवली ते ठाणे या मार्गातून ट्रेनमधून प्रवास करत होता. अवधेश हा मूळचा पटना येथील असून तो डोंबिवलीच्या ठाकूरवाडी परिसरात वास्तव्यास होता. अवधेश हा गुरुवारी सकाळी दिवा आणि ठाणे रेल्वे खाडीदरम्यान रेल्वेतून पडल्याचे समजत आहे. त्यानंतर त्याचा मृतदेह मुंब्राजवळील खाडीत सापडला.

नेमका अपघात कसा झाला?

गुरुवार सकाळी पडून अवधेशचा अपघात कसा झाला याची नेमकी माहिती ठाणे गव्हर्नमेंट रेल्वे पोलिसांना समलेली नाही. अवधेशच्या मृत्यूची संपूर्ण चौकशी व्हावी, अशी मागणी त्याच्या कुटुंबियांनी उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्यांना केली आहे.

कामाचे निमित्त ठरले अखेरचे

अवधेश दुबे हा आयआयटी पाटनामधून एमबीएमध्ये अ‍ॅडिशनल पीजी पदवीचे शिक्षण घेत होता. गुरुवारी सकाळी काही कामानिमित्त अवधेश हा मुंबईच्या सेंट्रलच्या नायर हॉस्पिटलमध्ये जात असताना ही घटना घडली.

ठाणे जीआरपीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी सांगितले की, गुरुवारी आम्हाला एका रेल्वे प्रवाशाकडून फोन आला, एक व्यक्ती खाडीजवळ ट्रेनमधून पडला आहे. फोन आल्यानंतर तात्काळ आमची टीम मुंब्रा रेल्वे ट्रॅकजवळ घटनास्थळी पोहोचली.

तत्पूर्वी, अवधेश याचा खाडीच्या चिखलातून मृतदेह काढण्यासाठी साधारण १५ मिनिटे लागली. त्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. सध्या पोलीस हा अपघात कसा घडला याचा तपास करत आहे. अपघात क्षेत्रातील भागातील सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

Mumbai Local Train
Thane News | ठाण्यातील खाजगी शाळेत विनयभंगाच प्रकरण | Marathi News

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com