Heavy Vehicle Ban: मुंब्रा बायपास, शिळफाटा मार्गावर अवजड वाहनांना बंदी; ठाण्यासह नवी मुंबईतील वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यता

Shilphata Road: सदर बंदी घातलेली वाहतूक ठाणे-बेलपूर मार्ग, पूर्व द्रुतगती या पर्यायांवरून वळवण्यात आलीये. त्यामुळे आता पर्यायी मार्गांवरील वाहतुकीचा ताण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Heavy Vehicle Ban
Heavy Vehicle BanSaam TV

Mumbra Bypass and Shilphata Road Traffic:

शिळफाटा रोडवर नेहमीच चाकरमान्यांसह, लांबून येणाऱ्या प्रवासी बस आणि विकास कामांसाठी वापरली जाणारी अवजड वाहने यांमुळे मोठी वाहतूक कोंडी (Traffic) निर्माण होते. त्यामुळे होणारी कोंडी थांबवण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून काही बदल करण्यात आलेत. मुंब्रा बायपास मार्ग, कल्याणफाटा आणि शिळफाटा मार्गांवर अवजड वाहनांना दिवसा बंदी घालण्यात आलीये.

Heavy Vehicle Ban
Kalyan News : काँग्रेस मंत्री प्रियांक खर्गेंच्या प्रतिमेला जोडे मार आंदोलन; सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्या विरोधात भाजप आक्रमक

सदर बंदी घातलेली वाहतूक ठाणे-बेलपूर मार्ग, पूर्व द्रुतगती मार्ग या पर्यायांवरून वळवण्यात आलीये. त्यामुळे आता पर्यायी मार्गांवरील वाहतुकीचा ताण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढील दोन महिने वाहतुकीतील हे बदल कायम राहणार आहेत. रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेतच अवजड वाहनांना मुंब्रा बायपास, शिळफाटा येथे प्रवास करता येणार आहे.

ठाणे शहरामध्ये अवजड वाहनांसाठी दुपारी १२ ते सायंकाळी ४ ही वेळ देण्यात आलीये. तसेच रात्री ११ ते पाहटे ५ यावेळेत प्रवासाची परवानगी देण्यात आलीये. उरण जेएनपीटी बंदरातून सुटणारी हजारो अवजड वाहने मुंब्रा बायपासमार्गे गुजरात, शिळफाटा, नाशिक आणि भिवंडीच्या दिशेने जातात. या मार्गावर मुंबईतील नोकरदारांची देखील गर्दी असते. गेल्या काही महिण्यांपासून शिळफाटा भागात उड्डाणपूलाचे काम सुरू आहे.

महामंडळाच्या जलवाहिनीची कामे आणि बुलेट ट्रेनच्या मार्गिकेच्या निर्माणाची कामे एमआयडीसी रोड परिसरात केली जाणार आहेत. त्यामुळे एमआयडीसी मार्गावर ठाणे पोलिसांनी वाहतूक कोंडीचा अभ्यास करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर वाहतूक बदल लागू केले होते. या काळात महापे, शिळफाटा, कल्याणफाटा मार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

मुंबई (Mumbai) नाशिक महामार्गाने उरण जेएनपीटी बंदराच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांना मुंब्रा बायपास मार्गाच्या दिशेने वाहतूक करण्यास बंदी असेल. येथील वाहने आनंदनगर जकातनाका, माजिवडामार्गे नवी मुंबईच्या दिशेने वळवली जातील.

तर कळंबोली, महापे येथून शिळफाट्याच्या दिशेने जाणारी अवजड वाहने शिळफाटा येथे थांबवली जातील. ही वाहने पूर्व द्रुतगती महामार्ग, कळंबोली, सानपाडा येथून ठाणे-बेलापूर मार्गे, ऐरोली-पटणी चौक, ऐरोली टोलनाकाने पुढे सोडली जातील.

घोडबंदर येथून खारेगाव टोलनाका मार्गे उरण जेएनपीटीच्या दिशेने येणारी अवजड वाहने माजिवडा, खारेगाव टोलनाका येथून मुंब्रा बायपास मार्गे जाण्यासाठी रोखली जातील. ही वाहने पुढे माजिवडा, आनंदनगर टोलनाका, ऐरोली टोलनाका मार्गे वळवली जातील.

Heavy Vehicle Ban
Tiger Walk On Busy Road: भाग भाग भाग शेर आया शेर...! वाघाच्या गळ्याला पट्टा बांधून वॉकिंगला निघाला तरुण, नागरिकांची पळापळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com