Ambernath: अंबरनाथच्या 'या' गावातील रस्ता गायब, दगड धोंड्यातून काढावी लागते वाट; नागरीक हैराण

Villagers Demand Road Repair Ambernath: अंबरनाथ तालुक्यातील चामटोली ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. गर्भवती महिला, वृद्ध, शाळकरी मुलांना दगड धोंड्यातून प्रवास करावा लागत आहे.
Ambernath
AmbernathSaam Tv News
Published On

मयुरेश कडव, साम टीव्ही

अंबरनाथ तालुक्यातील चामटोली ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. चामटोली गावात रस्ता नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गर्भवती महिला, वृद्ध, शाळकरी मुलांना दगड धोंड्यातून प्रवास करावा लागत आहे. मोठी दुर्घटना घडू नये म्हणून लवकरात लवकर हा रस्ता तयार करण्यात यावा, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.

खराब रस्त्यामुळे अंबरनाथमधील चामटोली गावातील लोक हैराण झाले आहेत. खराब रसत्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. एकीकडे तालुक्यातील सर्वच रस्त्यांचं काँक्रिटीकरण होत आहे, तर आमच्या गावातच अशी स्थिती का? असा सवाल इथल्या काही रहिवाशांमधून विचारला जात आहे.

Ambernath
Maharashtra Politics: शिंदेंची मंत्र्यांना सूचना, फडणवीसांचे आदेश पाळू नका, ठाकरेंच्या शिलेदारांचा दावा

अंबरनाथ तालुक्यातील चामटोली हे गाव बदलापूर शहरापासून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून इथल्या रहिवाशांना दगड धोंड्यांची वाट तुडवत प्रवास करावा लागत आहे. ग्रामपंचायतीकडून रस्ते बांधणीसाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात.

Ambernath
Viral News: 'आज आपल्या लग्नाची पहिली रात्र' तरूणानं फेसबुकवर फोटो केला शेअर; नेटकरी म्हणाले 'आता व्हिडिओ पाठवा'

मग ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यांची अवस्था अशी का? असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. विशेष म्हणजे गर्भवती स्त्रिया, वृद्ध, शाळकरी मुलांना या रस्त्यावरून प्रवास करताना मोठ्या त्रासाला समोर जावं लागत आहे. पावसाळ्यात या रस्त्यावरून ये-जा करणं म्हणजे तारेवरची कसरत. त्यामुळे पावसाळ्याच्या आत लवकरात लवकर हा रस्ता तयार करावा, अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com