Maharashtra Politics: शिंदेंची मंत्र्यांना सूचना, फडणवीसांचे आदेश पाळू नका, ठाकरेंच्या शिलेदारांचा दावा

Eknath Shinde Devendra Fadnavis Clash:'एकनाथ शिंदे स्वतःची स्वतंत्र कॅबिनेट घेतात. शिंदेंनी मंत्र्यांना फडणवीसांचे आदेश पाळू नका', असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केला असल्याचा खुलासा ठाकरे गटातील खासदाराने केला आहे.
Govt
GovtSaam Tv News
Published On

राज्यात गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिंदे गटात अंतर्गत धुसफूस सुरू आहे. त्यांच्यातील नाराजी आणि वाद चव्हाट्यावर आला आहे. महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कॉल्ड वॉर सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

नाशिक आणि रायगडमधील पालकमंत्रिपदाचा तिढा अद्याप सुटला सुटलेला नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका देखील भाजप स्वतंत्र लढणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण होत आहे. अशातच 'एकनाथ शिंदे स्वतःची स्वतंत्र कॅबिनेट घेतात. शिंदेंनी मंत्र्यांना फडणवीसांचे आदेश पाळू नका', असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केला असल्याचा खुलासा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

फडणवीस यांचे आदेश पाळू नका

''एकनाथ शिंदे स्वतःची स्वतंत्र कॅबिनेट घेतात. शिंदे गटातील मंत्र्यांना त्यांनी सांगितलेलं आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फार आदेश पाळू नका. अशा प्रकारे जेव्हा आवाहन दिलं जातं, हे आवाहन एकेकाळी मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये निर्माण झालं होतं. समांतर सरकार होतं, त्याला आम्ही अंडरवर्ल्ड सरकार म्हणायचो.

Govt
Navi Mumbai: नवी मुंबईचा सातवी पास नटवरलाल, २१ जणांना तब्बल २७ लाखांना गंडवलं

पॅरलेल सरकार, प्रति सरकार जर सुरू असेल तर, मंत्रालयात राजकीय अराजक निर्माण झालं आहे. देवेंद्र फडणवीस हे खंबीर मुख्यमंत्री आहेत असं आम्ही मानतो. मुख्यमंत्री जर हे मोडून काढणार नसतील तर, हे राज्य अराजकतेच्या खाली ढकललं जाईल'', असं संजय राऊत म्हणाले.

Govt
Crime News: हुंडा देऊनही २५ लाखांची मागणी, सासरच्यांनी तरूणीला HIV संक्रमित इंजेक्शन टोचलं, गुन्हा दाखल

''ईव्हीएमच्या माध्यमातून ५६, ५७ आमदार भाजपने जे निवडून आणले आहेत. त्या ताकदीवर सरकारला आव्हान देण्याचं प्रयत्न सुरू आहे'', असा देखील आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com