Shivsena Leaders Upset : पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीनंतर राष्ट्रवादी-शिवसेनेत खटके, शिंदे गटाच्या आमदारांची उघड विरोध करत नाराजी

Shivsena VS NCP : शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी म्हटलं की, नाराज होऊन आता काय करणार.
Ajit Pawar, eknath shinde
Ajit Pawar, eknath shindesaam tv
Published On: 

Mumbai News : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार अजित पवार यांना बंडखोरी करत अनेक आमदारांसोबत शिंदे-फडणवीस सरकार पाठिंबा दिला. 2 जुलै रोजी अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर 8 आमदारांना मंत्रिपदाची शपथ घेतली.

मात्र अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते सरकारमध्ये सामील झाल्याने शिंदे गट नाराज असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु होती. मात्र आता शिंदे गटाने आमदार, मंत्री उघडपणे नाराजी व्यक्त करु लागले आहे. (Latest Marathi News)

Ajit Pawar, eknath shinde
Nashik Political News : नाशिकमध्ये अजित पवार, भुजबळ आणि शरद पवार समर्थक आमने-सामने; पोलासांचा मोठा बंदोबस्त

भाजप-शिवसेना-अजित पवार गट युती सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे व राष्ट्रवादीत खटके उडाले आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांना सत्तेत मोठा वाटा मिळणार हे स्पष्ट होत असताना शिंदे गटाकडून याला विरोध होताना दिसत आहे. पालकमंत्री म्हणून आदिती तटकरे यांना स्वीकारणार नाही, अशी भूमिका रायगडच्या कर्जतमधील आमदार महेंद्र थोरवे यांनी घेतली आहे.  (Breaking News)

संजय शिरसाटही नाराज

राष्ट्रवादी आमच्यासोबत आली याचं स्वागत आहे. भाजप-शिवसेनेच्या विचारांसोबत सहमत असल्याचा आनंद आहे. राष्ट्रवादी आमच्यासोबत आली किंवा दुसरं कुणीही आलं तरी सत्तेचं विकेंद्रीकरण होतं. त्यामुळे सगळं सोडायचं असेल तर सत्ता कशासाठी? असं म्हणत संजय शिरसाट यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे.

Ajit Pawar, eknath shinde
Nashik Political News : नाशिकमध्ये अजित पवार, भुजबळ आणि शरद पवार समर्थक आमने-सामने; पोलासांचा मोठा बंदोबस्त

आर्धी भाकरी खावी लागणार

शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी म्हटलं की, नाराज होऊन आता काय करणार. जी वस्तुस्थिती आहे ती स्वीकारली पाहिजे. थोडी नाराजी राहणारच. कारण ज्याला एक भाकरी खायची होती त्याला आर्धीच मिळाली. ज्याला आर्धी खायची त्याला पाव मिळाली. तरीही आम्ही खूश आहोत. (Latest Political News)

येत्या 8 दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होईल. मी आता तरी मंत्रिमंडळात दिसायला पाहिजे. मी पहिल्या लिस्टमध्ये होतो, आता होईल, असंही भरत गोगावले यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.